आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#earthquake : 76 मिनिटांत 6 धक्के, भारतात नऊ जण ठार; नेपाळ-चीन सीमेवर केंद्रबिंदू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुकंपाचे धक्के जाणवताच लोक इमारतींमधून बाहेर पडू लागले. - Divya Marathi
भुकंपाचे धक्के जाणवताच लोक इमारतींमधून बाहेर पडू लागले.
नवी दिल्ली - मंगळवारी दुपारी नेपाळसह भारतातील दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. 76 मिनिटांमध्ये सहावेळा हे धक्के जाणवले त्याचा प्रभाव दिल्लीसह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पंजाबमध्येही जाणवला. या भूकंपाचे केंद्र नेपाळ आणि चीनच्या सीमेवर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या भुकंपात उत्तर प्रदेशच्या संभल आणि हमीरपूरमध्ये घर कोसळून दोन जण ठार झाले आहेत तर बिहारमध्ये सात जण ठार झाल्याची माहिती आहे.
या धक्क्यांमध्ये पहिला धक्का दुपारी 12:35 वाजता बसला. त्याची तीव्रता 7.4 एवढी होती. त्यानंतर 12.47, 1.11, 1:35, 1:42 आणि सहावा धक्का 1:51 मिनिटांनी जाणवला.
(पुढील स्लाइडवर पाहा, सोशल मिडियावर शेअर झालेला व्हिडिओ)
UPDATES
- नेपाळमध्ये 300 पेक्षा अधिक जखमी झाल्याची माहिती.
-------------
- संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्त्यांची माहिती, नेपाळमध्ये भूकंपग्रस्त भागांची माहती घेण्यासाठी काठमांडूहून हवाईदलाचे MI-17 V5 विमान रवाना.
-------------
- पीएमच्या आदेशावरून गृहमंत्रालयाने गाझियाबाद, गुवाहाटी, कोलकाता आणि भटिंडामध्ये एनडीआरएफला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.
-------------
- नेपाळच्या काठमांडूमध्ये नयाबाजार परिसरात एक इमारत कोसळली. अनेक गाडले गेल्याची शक्यता.
-------------
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. पीएमओ अधिकाऱ्यांना दिले निर्देश. सर्व आपत्ती व्यवस्थापन पथकांना सज्ज राहण्यास सांगितले. नेपाळमधील स्थितीबाबतही माहिती घेतली.
-------------
- नेपाळच्या भारतीय दुतावासाने सुरू केली हेल्पलाईन +977851107021, +9779851135141 पर संपर्क करता येईल.
-------------
- काठमांडूला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानाचा मार्ग बदलला.
-------------
- भूकंपामुळे बिहारमध्ये सहा जणांचा मृत्यू. उत्तर प्रदेशातही दोन ठार,
-------------
- उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये रुग्णालयातून रुग्णही पळाले.
-------------
- हवामान विभागाचे महासंचालक एल.एस. राठोड यांच्या मते आगामी अनेक आठवडे अशा प्रकारचे आफ्टर शॉक्स जाणवू शकतात.
-------------
- नेपाळमध्ये पुन्हा जाणवले भुकंपाचे धक्के.
-------------
- गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदींना भूकंपाच्या धक्क्यांबाबत माहिती दिली.
-------------
- नेपाळच्या सिंधुपालचौकात भूस्खलनात तीन जण जखमी. जख्मी।
-------------
- नेपाळच्या चौतारामध्ये अनेक इमारती कोसळल्याची माहिती.
-------------
- नेपाळचे काठमांडू एअरपोर्ट बंद करण्यात आले.
-------------
- युपीच्या संभळ जिल्ह्यात घर कोसळून एक ठार.
-------------
- गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नेपाळच्या राजदुताशी फोनवर चर्चा केली. केंद्रीय गृह सचिव एलसी गोयल यांनी नेपाळमधील भारताचे राजदूत रंजीत रे यांच्याशी बोलल्याची माहितीही राजनाथ यांनी दिली. तसेच एनडीआरएफला अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-------------
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले घाबरण्याचे कारण नाही, नेपाळला लागून असलेल्या भागांतच जाणवले धक्के. एनडीआरएफची बैठक सुरू.
-------------
- पुन्हा एकदा जाणवले भूकंपाचे धक्के, नेपाळच्या कोडारी येथे केंद्र. रिक्टर स्केलवर 6.3 एवडी तीव्रता.
-------------
- भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला, रिक्टर स्केलवर तीव्रता 5.6.
-------------
- दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के, केंद्र नेपाळ-चीन सीमेवर. तीव्रता 7.4 एवढी.

मेट्रो थांबवली
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर दिल्ली मेट्रोची वाहतूक थांबवण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोने सर्व रेल्वेंची वाहतूकहू थांबवली आहे. कोलकात्यातही मेट्रोची वाहतूक थांबवण्यात आली आहे. भुकंपामुळे दिल्लीत सुप्रीमकोर्टाचे कामकाजही ठप्प आहे.

कोडारी येथे केंद्र
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार नेपाळच्या काठमंडूपासून 82 किमी अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळच्या दक्षिण-पूर्व कोडारी पासून 23 किमी अंतरावर जमिनीखाली 19 किमीवर भूकंपाचे केंद्र आहे.

आफ्टर शॉक नाही धक्काच
नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर तज्ज्ञांनी या भूकंपाचे किमान 10 आफ्टर शॉक्स येऊ शकतात अशी चेतावणी दिली होती. त्यातही उत्तर भारतात याचा अधिक प्रभाव जाणवू शकतो असेही सांगण्यात आले होते. पण भूगर्भतज्ज्ञ अरुण बापट यांच्या मते याला आफ्टर शॉक म्हटले जाऊ शकत नाही. कारण त्याची तीव्रता एवढी जास्त नसते. हा आफ्टर शॉक असता तर त्याची तीव्रता 6.3 पेक्षा अधिक नसती. पण हा 7.1 तीव्रतेचा धक्का होता. त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, भूकंपानंतर रस्त्यावर येऊन उभे असलेले लोक...