आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Earthquake In Himachal Pradesh, Latest News In Marathi

5.1 रिश्टर स्केलच्या भूंकपाने हादरले हिमाचल प्रदेश, जीवितहानी नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- हिमाचल प्रदेश आज (गुरुवार) दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास 5.1 रिश्टर स्केल तिव्रतेच्या भूकंपाने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू चंबा-कांगडा जिल्ह्यात होता. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु भूकंपामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीलाही भूकंपाचे धक्के जाणवल्याची सूत्रांन‍ी माहिती दिली.

पालमपूर, धर्मशाळा जिल्ह्यातही या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे हिमाचल प्रदेशातील लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. शेकडो लोक भीतीमुळे घराच्या बाहेर निघाले आहेत.