आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात 5.8 तीव्रतेचा भूकंप, उत्तराखंडमध्ये महिला ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोमवारी रात्री उशीरा जवळपास 10.33 वाजता राजधानी दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.8 अश‍ी नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. उत्तराखंडमधील कालीमठजवळ एक घर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 
 
संपूर्ण उत्तर भारतात जाणवले धक्के... 
- दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात या भूकंपाचे धक्के जाणवले. 
- राजधानीसह उत्तराखंड, पंजाब, उत्तरप्रदेशमध्ये सुमारे 30 सेकंदापर्यंत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. 
- या भूकंपाचे केंद्र उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये जमिनीखाली 33 किमी खोलवर असल्याचे सांगितले जात आहे. 
- भूकंपानंतर बाबा रामदेव यांनी ट्वीट करून हरिद्वारच्या पतंजलीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले. 

NDRF ची पथके पाठवली 
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट केले की, त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थितीबाबत माहिती घेतली आहे. उत्तराखंड हेच भूकंपाचे केंद्र आहे. सर्व लोकांसाठी त्यांनी प्रार्थनाही केली. 
- पीएमओ सतत उत्तराखंडमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी ट्वीट केले. 
- भूकंपानंतर एनडीआरएफच्या टीम हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. तसेच गृह मंत्रालयाने याबाबतचा रिपोर्टही मागितला आहे. 
- घटनेनंतर एनडीआरएफची दोन पथके उत्तराखंडला पाठवण्यात आली आहेत. 

दिल्ली धोकादायक झोनमध्ये 
- भूगर्भ तज्ज्ञांनी भूकंपाचा धोका पाहता देशाला सीस्मिक झोनमध्ये विभागले आहे. 
- सर्वात कमी धोका झोन 2 मध्ये आहे, तर सर्वाधिक धोका झोन 5 मध्ये आहे. 
- दिल्ली झोन 4 मध्ये आहे, त्यामुळे येथे 6 पेक्षा अधिक तीव्रतेच्या भूकंपाने मोठे नुकसान होऊ शकते. 
- झोन 4 मध्ये मुंबई, दिल्लीसारखी शहरे आहेत. त्याशिवाय जम्मू-काश्मीर, हिमाचल, पश्चिम गुजरात, उत्तर प्रदेशचे डोंगराळ बाग आणि बिहार-नेपाळ सीमा परिसराचा यात समावेश आहे. येथे भूकंपाचा धोका कायम राहतो. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...