आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला, पाक-अफगाण सीमेवर भूकंपाचा केंद्रबिंदू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी पाकिस्ताना इस्लामाबादमध्ये भूंकपानंतर भयभीत झालेले लोक घराबाहेर पडले. \'ट्विटर\'वर हे छायाचित्र शेअर झाले आहेत. - Divya Marathi
सोमवारी पाकिस्ताना इस्लामाबादमध्ये भूंकपानंतर भयभीत झालेले लोक घराबाहेर पडले. \'ट्विटर\'वर हे छायाचित्र शेअर झाले आहेत.
नवी दिल्ली- दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्ये सोमवारी भूकंपाने हादरले. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. पाच मिनिटांत तीन धक्के जाणवले. या भूकंपाची तिव्रता 6.7 रिश्टर स्केल होती. भूकंपाचा केंद्र पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर जमिनीत 210 किलोमीटर अंतरावर आहे. हिंदुकुश रेंजमध्ये हा भाग येतो.
पाकिस्तानासह अफगाणिस्थानात भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय दिल्ली-एनसीआर, जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

काश्मीर आणि पंजाबमध्ये भूकंपाचे तिव्र धक्के बसले. याशिवाय पाकिस्तानातही भूकंपाचा धक्के जाणवताच बहुतांश लोक घराबाहेर निघाले. यापूर्वी 25 जुलै पाकिस्तानात 5.1 तिव्रतेचा भूकंप आला होता. इस्लामाबादपासून 16 किलोमीटर अंतरावर होता. यात तिघांचा मृत्यू झाला होता.

नेपाळमधील गोरखा जिल्ह्यात सोमवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान 25 एप्रिलला नेपाळमध्ये आलेल्या विध्वंसकारी भूकंपाने सुमारे 10 हजार लोकांचा बळी घेतला होता. तर लाखो लोकांना बेघर केले होते. मागील तीन महिन्यांच्या काळात नेपाळमध्ये एकूण 375 धक्के बसले आहेत.