आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंपाने ईशान्य भारतातील 11 राज्य हादरले, लोक होते साखर झोपेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्फाळमध्ये आलेल्या भूकंपात चार मजली इमारत कोसळली. ढिगारा काढताना जवान. - Divya Marathi
इम्फाळमध्ये आलेल्या भूकंपात चार मजली इमारत कोसळली. ढिगारा काढताना जवान.
नवी दिल्ली / इम्फाळ - देशातील ईशान्येकडील राज्यांना सोमवारी पाहाटे भूकंपाचे 6.7 रिश्टर स्केलचे धक्के बसले. त्यानंतर दुसरा धक्का 9 वाजून 27 मिनीटांनी बसला. या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले. दुपारी तीनपर्यंत भूकंतपात दगावलेल्यांची संख्या 8 वर गेली होती, तर 100 हून अधिक लोक जखमी असल्याचे वृत्त आहे. भूकंपाचे धक्के एवढे तीव्र होते की कित्येक इमारती जमीनदोस्त झाल्या. अनेक इमारतींच्या कॉलमला तडे गेले.

11 राज्यांना भूकंपाचे धक्के
मणिपुरची राजधानी इम्फाळपासून 33 किलोमीट दूर तेमलाँगमध्ये भुपृष्ठापासून खाली 17 किलोमीटर खोल भूकंपाचे केंद्र होते. सोमवारी पाहाटे 4.37 वाजता आलेल्या भूकंपाचा परिणाम आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नगालँड, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि सिक्किम येथे जाणवला.

एनडीआरएफच्या 11 तुकड्या भूकंप प्रभावित भागात मदतीसाठी पोहोचल्या आहेत.
का होतो भूकंप जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
पुढील स्लाइडमध्ये पाहा, भूकंपामुळे झालेले नुकसान...