आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळमध्ये भूकंप, मृतांचा आकडा 10 हजारांवर धराहारा टॉवरमधून काढले 180 मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/काठमांडू- नेपाळमध्ये आलेल्या शक्तीशाली भूकंपाने आतापर्यंत10 हजार लोकांचा बळी घेतला आहे. त्याचप्रमाणे हजारो नागरीक जखमी झाले आहेत. काठमांडूमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या आहे. नऊ मजली धारहारा मनोरा आणि जानकी मंदिर पूर्णपणे उद्‍धवस्त झाले आहे. ढिगार्‍याखाली 450 लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा हजारांच्या घरात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मदतकार्य युद्धपातळीवर सुरु झाले आहे. काठमांडू येथील भारतीय दुतावासने हेल्पलाइन क्रमांक +9779851107021, +9779851135141 जारी केले आहेत.

नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या शक्तीशाली भूकंपाचे धक्के दिल्लीसह भारतात अनेक राज्यात तसेच पाकिस्‍तान, बांगलादेशात जाणवले. रिश्टर स्केलवर याची तिव्रता 7.9 एवढी नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र नेपाळची राजधानी काठमांडूपासून 83 किलोमीटर अंतरावर भूपृष्ठाखाली 31 किलोमीटर अंतरावर होते. महाराष्ट्रातील नागपुर, चंद्रपूरात अनेक भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. दरम्यान, नेपाळमध्ये गेलेले महाराष्ट्रातील सुमारे 500 पर्यटक सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.
काठमांडूमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. नऊ मजली धारहारा मनोरा कोसळला आहे. ढिगार्‍याखाली 450 लोक अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. रस्त्यांना मोठे तडे पडले आहे. दोन जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

भूकंपामुळे नेपाळमध्ये उडाला हाहाकार...
> काठमांडूमध्ये सगळे रुग्णालये 'फूल्ल' झाल्याने रस्त्यावरूच जखमींवर उपचार.
> काठमांडूमधील मशहूर प्रसिद्ध नऊ मजली धारहारा मनोरा कोसळला. ढिगार्‍याखाली 450 लोक अडकले? धारहारा मनोर्‍याला 'नेपाळचा कुतुबमीनार' असे संबोधले जात होते. नेपाळचा व्ह्यु पाहाण्‍यासाठी 160 पर्यटकांनी तिक‍िट घेतले होते. त्यापैकी अनेक जण बेपत्ता आहेत.
​> काठमांडूमध्ये यूनेस्कोद्वारा वर्ल्ड हेरिटेज साइट घोषित करण्यात आलेला 'दरबार स्क्वेअर' पूर्णपणे उद्‍धवस्त झाले आहे.
​> जनकपूर येथील जानकी मंदिर उद्‍धवस्त झाले आहे. जनकपूर येथे सीतेचे जन्मस्थळ आहे.
​> एव्हेरेस्ट भागात हिमस्खलन झाल्याचे वृत्त आहे.
> नेपाळमध्ये अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे रस्त्याला मोठे तडे पडले आहे.
> भारतातातर्फे एनडीआरएफचे पथक मदतकार्यासाठी लवकरच रवाना होणार आहे.
> नेपाळचा आंतरराष्‍ट्रीय विमानतळ बंद करण्‍यात आले असून सर्व विमाने भारताकडे वळवण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्लीसह उत्तर भारत आज दोनदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. पहिला धक्का 11 वाजून 41 मिनिटांनी जाणवला. त्याची तीव्रता 7.4 तर दुसरा धक्का 12 वाजून 19 मिनिटांनी जाणवला. रिश्टर स्‍केलवर या भूकंपाची तीव्रता 6 मोजण्यात आली. साधारण दीड ते दोन मिनिटे भूकंपाची धक्के जाणवले.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी तीन वाजता तातडीची बैठक बोलवली आहे. भूकंप अाला तेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान हे भोपाळमध्ये कॅबिनेटच्या बैठकीत होते. भूकंपाचे धक्के जाणवताच चौहान यांच्यासह सगळे मंत्री धावतच मंत्रालयातून बाहेर आले. वल्लभ भवन, विंध्याचल भवन आणि सातपुड़ा भवन रिकामे करण्‍यात आले असून दुपारी तीन वाजेपर्यंत मंत्रालयाच्या तिन्ही इमारतीत प्रवेश न करण्‍याचे आदेश मुख्यमंत्री चौहान यांनी केले आहे.

नेपाळच्या इतिहासात हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे सांगितले जात आहे. काठमांडूमध्ये काही इमारतींच्या भिंतींनाही तडे गेले आहे. फोन सेवा ठप्प झाली आहे. खबरदारी म्हणून दिल्ली आणि कोलकाता मेट्रोची वाहतूक बंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारतात कुठे जाणवले भूकंपाचे धक्के...
भारतात उत्तर प्रदेश, मध्‍यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, सिक्किम, दिल्‍ली, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. बिहार, पश्चिम बंगाल जाणवलेले भूकंपाचे धक्के जास्त जोरदार असल्याचे भूगर्भ विशेषज्ज्ञ एस. के. शर्मा यांनी सांगितले आहे.

81 वर्षांनंतर नेपाळमध्ये आला शक्तीशाली भूकंप...
हिमालयाच्या कुशीत असलेला नेपाळ हा देश भूकंपाच्या फॉल्ट झोनमध्ये आहे. नेपाळमधून महेंद्र हायवे फॉल्ट लाईन जाते. ही फॉल्ट लाइन उत्तराखंडहून पुढे दिल्लीपर्यंत जाते. याच कारणामुळे नेपाळमधील भूकंपामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि पूर्व-उत्तर भारतात धक्के जाणवले.

दरम्यान, 1934 मध्येही अशा स्वरुपाचा शक्तीशाली भूकंप आला होता. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 8.4 एवढी मोजण्यात आली होती. शिलॉंगमध्ये 1897 मध्ये 8.5 तीव्रतेचा भूकंप आला होता.
रिश्टर स्केलनुसार असते भुकंपाची तिव्रता
रिश्टर स्केल
परिणाम
0 ते 1.9
केवळ सिज्मोग्राफवर माहिती मिळते.
2 ते 2.9
हल्के कंपन.
3 ते 3.9
एखादा ट्रक जवळून गेला तरी अशा स्वरुपाचे धक्के जाणवतात.
4 ते 4.9
खिडक्यांच्या काचा फुटू शकतात. भिंतींवरील फोटो पडू शकतात.
5 ते 5.9
अवजड फर्निचर हलू शकते.
6 ते 6.9
इमारतीच्या बिमला क्रॅंक्स पडू शकतात. वरच्या मजल्यांना नुकसान.
7 से 7.9
इमारती कोसळतात. जमिनीच्या खालील पाईपला नुकसान.
8 ते 8.9
इमारतींसह अवाढव्य पूलही कोसळतात.
9 आणि यापेक्षा जास्त
संपूर्ण विध्वंस. जमिन झोकांड्या घालत असते. समुद्रात त्सुनामी येतात.
* रिश्टर स्केलवर प्रत्येक टप्पा मागील टप्प्याच्या तुलनेत दहा पटीने जास्त असतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाची सोशल मीडियात शेअर झालेले फोटो...