आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशान्य भारतात 5 तासांत पुन्हा भूकंप; मणिपूरमध्ये 8 ठार, 100 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूकंपामुळे बहुमजली इमारती पडल्या आहेत. - Divya Marathi
भूकंपामुळे बहुमजली इमारती पडल्या आहेत.
नवी दिल्ली - ईशान्य भारताला भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 6.7 रिक्टर स्केल होती. पाच तासांत पुन्हा एकदा भूकंप आला. याची तीव्रता 3.6 होती. भूकंपाचे केंद्र मणिपूरची राजधानी इम्फाळपासून 33 किलोमीटरवर तेमलाँग येथे जमीनीखाली 10 किलोमीटर खोल असल्याचे सांगितले गेले. मणिपूर, अरुणाचल प्रदेशसह पश्चिम बंगाल, झारखंड येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मणिपूरमध्ये आठ ठार आणि जवळपास 100 हून अधिक लोक जखमी आहेत.

कुठे होते भूकंपाचे केंद्र
भूकंपाचे केंद्र मणिपूरची राजधानी इम्फाळपासून 33 किलोमीटरवर तेमलाँग येथे जमीनीखाली 10 किलोमीटर खोल असल्याचे सांगितले गेले. भूकंपात मोठ्याप्रमाणात वित्तहानीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या 11 राज्यांमध्ये भूकंपाचा परिणाम
मणिपुर, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि सिक्किम येथे भूकंपाचा परिणाम जाणवला.

केव्हा आला भूकंप
सोमवारी पाहाटे 4 वाजून 35 मिनीटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर पाच तासांत पुन्हा एकदा धक्के जाणावले.
LIVE UPDATS
- दिल्लीहून एनडीआरएफची टीम मणिपूरला पाठवली जाणार.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांसोबत बातचीत केली.
- भूकंपामुळे मणिपूरमध्ये एकाचा मृत्यू.
- त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी ट्विट केले, ''Agartala seemingly OK after quake of Richter 6.7,epicentre near Imphal,not too far from here. Raj Bhavan shook,though,and we woke up''

केंद्रीय गृहमंत्री आसाममध्ये
- भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन सांगितले, गृहमंत्री राजनाथसिंह आसाममध्ये आहेत. त्यांच्यासोबत भूकंपानंतरच्या परिस्थितीवर चर्चा झाली. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
- राजनाथसिंह सिलिगुडीच्या राजभवनात होते. भूकंप आला तेव्हा माझी रुम देखील हलली होती.

गेल्या महिन्यात बसले होते धक्के
- बिहार आणि झारखंडच्या काही जिल्ह्यांमध्ये 15 डिसेंबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते.
- भयभीत लोक रस्त्यावर धावले होते. या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल मोजली गेली होती. जवळपास पाच सेकंद धरणीचे कंपन होत होते.
- वास्तविक या भूकंपाने फार नुकसान झाले नव्हते.

का येतो भूकंप?
पृथ्वीच्या पोटात सात प्लेट्स असतात ज्या सतत फिरत असतात. ज्या ठिकाणी या प्लेट्स एकमेकांना धडकतात त्या भागाला फॉल्ट लाइन संबोधले जाते. परत-परत प्लेट्स एकमेकांना धडकण्यामुळे त्याचे कोणे मोडले जातात. जास्त दबाव वाढला तर त्या तूटतात आणि आतील ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधत असते. त्या हलचालीनंतर भूकंप होतो.
भूकंपामुळे किती नुकसान होते
रिक्टर स्केल
परिणाम
0 ते 1.9
फक्त सीज्मोग्राफनेच कळते.
2 ते 2.9
हल्के कंपन.
3 ते 3.9
एखादा ट्रक तुमच्या शेजारून जावा, एवढा परिणाम.
4 ते 4.9
खिडकीच्या काचा फुटू शकतात, भिंतीवर टांगलेल्या फोटोफ्रेम पडू शकतात.
5 ते 5.9
फर्नीचर जागेवरुन हलू शकते.
6 ते 6.9
इमारतींचा पाया हलू शकतो. वरच्या मजल्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता.
7 ते 7.9
इमारती कोसळतात. जमीनीच्या आतील पाइप फुटू शकतात.
8 ते 8.9
इमारतींसह मोठ-मोठे पुल पडू शकतात. सुनामीचा धोका निर्माण होऊ शकतो.
9 आणि त्यापेक्षा जास्त
सर्वत्र नासधूस. कोणी मैदानात उभे असेल तर त्याला जमीन हलताना दिसेल. समुद्र जवळ असेल तर सुनामी.
भूकंपाचे धक्के रिश्टर स्केलवर आधीच्या स्केलपेक्षा 10 पटीने जास्त शक्तीशाली असतात.
पुढील स्लाइडमध्ये, भूकंपामुळे झालेले नुकसान