नवी दिल्ली- राजधानी दिल्लीसह देशातील अनेक राज्यांना बुधवारी भूकंपाचे हादरे बसले. तथापि, जीवित वा वित्तहानीचे वृत्त नाही. रिश्टर मापकावर त्याची तीव्रता 7 मोजण्यात आली. हवामान खात्यानुसार संध्याकाळी 7.25 ला आलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू भारत-म्यानमार सीमेवर भूगर्भात 134 किलोमीटर अंतरावर होता.
दिल्ली, एनसीआर, कोलकाता, पाटणा, रांची आणि गुवाहाटीत भूकंपाच्या हादऱ्यांनंतर लोकांनी घराबाहेर पळ काढला. तथापि, भूकंपामुळे देशात कुठेही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील हिंदुकुश रेंजला भूकंपाचा धक्का बसला होता.
देशात कुठे-कुठे जाणवले भूकंपाचे धक्के...
- दिल्ली, हरियाणा, बिहार, पश्चिम बंगाल, आसम, मणिपूरसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले.
- भूकंपाचा केंद्रबिंदू भारत-म्यानमार सीमेवर भूगर्भात 134 किलोमीटर अंतरावर होता.
- कोलकातासह पश्चिम बंगालमधील मालदा, दिनाजपूर, सिलीगुडी, जलपाईगुडीसारख्या शहरांमध्ये भूकंपाच्या हादऱ्यांनंतर लोकांनी घराबाहेर पळ काढला.
आसममध्ये बत्तीगुल...
- बुधवारी सायंकाळी आलेल्या भूकंपामुळे आसाममधील गुवाहाटीसह आजुबाजुच्या शहरांमधील बत्तीगुल झाली आहे.
- राज्यात कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाली नसल्याचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी एक न्यूज चॅनलला माहिती दिली आहे.
अंदमान बेटालाही बसला भूकंपाचा धक्का...
- अंदमान बेटालाही बुधवारी भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती मिळाली आहे.
- म्यानमारनंतर 20 मिनिटांनी अंदमानात 4.7 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला.
भारताशेजारील राज्यही हादरले...
- पूर्व भारतासह नेपाळ, बांगलादेश व तिबेटही भूकंपाने हादरले.
- नेपाळमध्ये मागीलवर्षी आलेल्या विनाशकारी भूकंपाने 9000 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला होताे. हजारो लोकांवर बेघर होण्याची वेळ आली होती.