आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इबोलाच्या प्रतिबंधासाठी तपास यंत्रणा सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इबोला हा आतापर्यंतचा सर्वाधिक धोकादायक व्हायरस असल्याने, सरकारने बचावात्मक मोहीम जाहीर केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुरक्षा यंत्रणांना यासाठी कामाला लावले आहे. लियोन, लायबेरिया, गुएना आणि नायजेरिया इत्यादी आफ्रिकी देशांतून येणार्‍या प्रवाशांवर नजर ठेवण्यात येत आहे. या देशांतून येणार्‍या प्रवाशांना उलट्या, ताप, डोकेदुखी, लाल डोळे, कफ यांची समस्या आहे अथवा नाही, याची शहानिशा विमानतळावरच करण्यात येत आहे. त्यासाठी सुरक्षा व तपास यंत्रणा वाढवण्यात आली आहे.

इबोला व्हायरसची लक्षणे नसल्यासच भारतात प्रवेशास परवानगी दिली जात आहे. पश्चिम आफ्रिकन देशांत इबोलाच्या प्रसाराने शेकडोंनी जीवितहानी झाली आहे. या देशांमध्ये 40 हजार भारतीय राहतात. आफ्रिकेचे नागरिकही शिक्षण व पर्यटनासाठी मोठ्या संख्येने भारतात येतात. या संसर्गाकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. इबोला जगातील सर्वात घातक विषाणू असून त्यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही