आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंतनागमधील पोट निवडणूक रद्द, \'J&K मध्ये सध्या निवडणूक घेण्यासारखी परिस्थिती नाही\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनंतनाग येथे होणारी 25 मे रोजीची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. - Divya Marathi
अनंतनाग येथे होणारी 25 मे रोजीची निवडणूक रद्द करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने अनंतनाग येथे 25 मे रोजी होऊ घातलेली पोट निवडणूक रद्द केली आहे. सध्या काश्मीरमध्ये निवडणूक करण्यासारखे वातावरण नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. सोमवारी पाकिस्तान आर्मीने सीमारेषा ओलांडून दोन भारतीय जवानांचे शिर कलम केले. तर, दुसरीकडे दहशतवाद्यांनी कॅश व्हॅनवर हल्ला केला. यात 5 पोलिस जवान शहीद झाले. बँकेचे दोन अधिकारीही मारले गेले. 

काश्मीर सतत धुमसत आहे...
- श्रीनगरमध्ये 9 एप्रिल रोजी झालेल्या पोट निवडणुकीदरम्यान हिंसाचार भडकला होता. यात 8 जण मारले गेले होते. त्या दिवशी सीआरपीएफच्या जीपवर एका काश्मीरी युवकाला बांधल्याचे समोर आले होते. 
- सीआरपीएफने तो पत्थरबाज असल्याचे म्हटले होते. सोबतच तसे केले नसते तर दगडफेक करणाऱ्या जमावाने जवानांना लक्ष्य केले असते, असाही दावा पोलिसांनी केला होता. 
- काश्मीर सध्या धुमसत आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर पुलवामा येथे शाळकरी मुलांनीही लष्करावर दगडफेक केली होती.
- जम्मू-काश्मीरमध्ये बिघडलेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्या म्हणाल्या होत्या, की परिस्थिती सुधारण्यासाठी चर्चा होणे गरजेचे आहे. वाजपेयी सरकारच्या काळात जेथे चर्चा थांबली होती, तेथूनच पुन्हा सुरुवात होण्याची गरज आहे. 
 
हेही वाचा... 
बातम्या आणखी आहेत...