आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचार संहितेचे उल्लंघन: वादग्रस्त वक्तव्यावरून साक्षी महाराजांना EC ने बजावली नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे खासदार साक्षी महाराज यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटिस बजावली आहे. वादग्रस्त वक्तव्य करून आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका साक्षी महाराज यांच्यावर ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने साक्षी महाराज यांना उत्तर देण्यास 11 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.

दरम्यान, साक्षी महाराज यांनी एका धार्मिक कार्यक्रमात मुसलमानांना टारगेट केले होते. 4 बायका करणारे आणि 40 अपत्ये जन्माला घालणारे देशाच्या लोकसंख्या वाढीस कारणीभूत असल्याचे साक्षी महाराज यांनी म्हटले होते. उत्तर प्रदेशात आचार संहिता लागू आहे. फेबुवारी- मार्च महिन्यात 7 टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे.

साक्षी महाराज यांच्याविरोधात FIR दाखल...
- वादग्रस्त वक्तय करणारे साक्षी महाराज यांच्याविरोधात FIR दाखल करण्‍यात आली आहे. कथित वक्तव्यावर निवडणूक आयोगाने साक्षी यांना स्पष्टीकरण मागितले आहे. साक्षी हे  उन्नाव येथील खासदार आहेत.

दरम्यान, साक्षी महाराज यांनी मुस्लिम समुदायाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेत निवडणूक आयोगाने मेरठ जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवण्यात आला होता.

भाजप खासदाराच्या वक्तव्यानंतर देशभरात खळबळ उडाली. त्या पार्श्वभूमीवर नियमानुसार जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडे अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना धार्मिक किंवा जातीच्या आधारे मते मागू नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे बजावले होते. परंतु साक्षी महाराजांचे वक्तव्य त्याचे उल्लंघन करत असल्याचा दावा करून शनिवारी त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला, अशी माहिती मेरठचे जिल्हा पोलिस अधीक्षक जे. रविंद्र गौड यांनी दिली.

सदर बाजार पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्या शिवाय काँग्रेसने देखील साक्षी महाराजांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल, असे सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील निवडणूक तोंडावर असतानाच शुक्रवारी साक्षी यांनी वादग्रस्त विधान केले होते.

पुढील स्लाइडवर वाचा...आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन : काँग्रेस

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)