आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • EC May Frame Charges Against Ashok Chavan In Paid News Case

आजपासून ‘पेड न्यूज’ प्रकरणी सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध दाखल ‘पेड न्यूज’ प्रकरणाची सुनावणी निवडणूक आयोग सोमवारपासून सुरू करण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात चव्हाण यांच्याविरुद्ध या प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले होते.

मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत आणि आयुक्त एस. एस. ब्रrा तसेच एन. ए. झैदी यांचा समावेश असलेल्या पूर्ण पीठासमोर ही सुनावणी होणार असून हेच पीठ निकाल जाहीर करेल. चव्हाण यांच्याविरुद्ध तक्रार करणारे महाराष्ट्राचे माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी व किरीट सोमय्या यांना आयोगाने सर्व पुरावे 4 जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आपण सर्व पुरावे दाखल केले असल्याचे किन्हाळकर यांनी सांगितले.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध उभे असलेले अपक्ष उमेदवार माधवराव किन्हाळकर यांनी चव्हाण यांच्यावर पेड न्यूज छापून आणल्याचा आरोप केला होता.