आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • EC Stops Implementation Of Education Loan Interest waiver Plan

शैक्षणिक कर्ज व्याजमाफी, निवडणूक आयोगाची स्थगिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - निवडणुका होईपर्यंत शैक्षणिक कर्जाच्या व्याजमाफी योजनेची अंमलबजावणी होऊ नये, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या योजनेचा प्रचारदेखील करू नये, असे आयोगाने अर्थ खात्याला सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी 9 टप्प्यांचे मतदान 12 मे रोजी संपणार आहे. मतमोजणी 16 मे रोजी होणार आहे. सरकारने 2600 कोटींच्या योजनेनुसार 9 लाख विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज व्याजमाफी दिली. त्यात 2009पूर्वी घेतलेल्या कर्जाच्या (31 डिसेंबर 2013पर्यंतच्या) व्याजाचा भार सरकार उचलणार होते. कर्जदाराला जानेवारी 2014चे व्याज भरावे लागणार होते. हंगामी अर्थसंकल्पात सरकारने ही घोषणा केली होती. सरकारी बँकांत 2013 पर्यंत कर्जाची 25,70.254 खाती होती. त्यावर 57,700 कोटींची थकबाकी होती.