आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eco Friendly Colors Deman Increasing ; Tihar Prisoners Making This Coulour

तिहारमधील कैद्यांनी बनवलेल्या पर्यावरण स्नेही गुलालाची मागणी वाढली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - यंदाच्या होलिकोत्सवात तिहार तुरुंगातील कैद्यांनी तयार केलेल्या गुलालाची मागणी वाढली आहे. आशियातील सर्वात मोठ्या तुरुंगात हर्बल गुलालाचे उत्पादन केले जाते.

तुरुंगातील कैद्यांकडून तयार करून घेण्यात येणा-या रंगाचे यंदा अनेक पटीने उत्पादन वाढले आहे. वाढत्या मागणीमुळे उत्पादन वाढवावे लागले आहे. यंदा आम्हाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती तिहार तुरुंगाचे जनसंपर्क अधिकारी सुनील गुप्ता यांनी दिली. हा रंग नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आल्याने त्याचा त्वचेला किंवा आरोग्याला काहीही धोका नाही. त्याशिवाय रंगाची प्रयोगशाळेतदेखील चाचणी घेण्यात आली आहे. रंगासाठी अकुशल, सेमी कुशल, कुशल अशा तीन प्रकारात कैद्यांची वाटणी करण्यात आली आहे. रंग उत्पादनाच्या कामात एका कैद्याला दिवसभरात किमान 110 रुपये एवढी रोजंदारी मिळते. कैद्यांना प्रशिक्षित करण्यावर आमचा भर आहे. कैद्यांमध्ये उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याचा आमचा हेतू आहे, अशी माहिती दिव्य ज्योती संस्थान या एनजीओच्या अध्यक्षा साध्वी जयाभारती यांनी दिली.

दोन वर्षांत 20 पट
2010 हा प्रकल्प सुरू झाला. त्यावर्षी रंगाचे उत्पादन 5000 ते 6000 युनिट्स घेण्यात आले. यंदा हे उत्पादन 1 लाख युनिट्सपर्यंत पोहोचले आहे. प्रशिक्षित कैद्यांकडून यंदा कोरड्या रंगाच्या 100 ग्रॅमच्या 10 हजार थैल्या तयार करण्यात आल्या आहेत.

50पुरुष तर 30 महिला कैद्यांनी हर्बल रंगाची निर्मिती केली आहे.
08रशियाच्या सोयूझ टीएमए-08एम अंतराळ यानाला मंगळवारी रेल्वेवर टाकून बैकनूरला नेण्यात आले. बैकनूर कास्मोड्रोमवरून हे यान शुक्रवारी अवकाशात झेपावणार आहे.या यानामधून रशियन पावेल विनोग्रादोव्ह,अलेक्झांडर मिसुरकीन आणि अमेरिकी ख्रिस कॅसिडी हे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये जाणार आहेत.महिला कैद्यांचा दोन वर्षांपूर्वी रंग उत्पादनाच्या प्रकल्पात सहभाग होता.
25 ते 30दुकानातून या रंगांची नवी दिल्लीत विक्री करण्यात येत आहे. तेथे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.

मका-गव्हापासून रंग
मका आणि गव्हापासून रंगाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा शरीरावर वाईट परिणाम होणार नाही, असे जया भारती यांनी सांगितले.कैद्यांकडून पॅकेजिंगचे कामही करून घेतले जाते. विशिष्ट प्रकारच्या शाईचा वापर करून पॅकेजिंग करण्यात येते. पॅकेजिंगची ही पद्धत जगभरात कौतुकास पात्र ठरली आहे.

एनजीओचे काम
दिव्य ज्योती संस्थान या एनजीओने कैद्यांचे प्रशिक्षण आणि
पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत रंगाचे उत्पादन केले जाते. तिहार तुरुंगातील कॉम्प्लेक्समध्ये काम करणा-या सर्वात मोठ्या एनजीओमध्ये दिव्य ज्योती संस्थानचा समावेश होतो.