आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंसेवी संस्थांमुळे आर्थिक विकासाला खीळ : आयबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील अनेक बिगरसरकारी स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) विरोधामुळे सरकारला अनेक प्रकल्प गुंडाळावे लागले. यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला फटका बसून तो दोन ते तीन टक्क्यांनी मंदावल्याचे गुप्तचर विभागाच्या अहवालात म्हटले आहे. ‘इम्पॅक्ट ऑफ एनजीओ ऑन डेव्हलपमेंट’ या अहवालात ग्रीनपीस या एनजीओचा उल्लेख आहे. ग्रीनपीसने कुडानकुलमला विरोध करणारे आपचे उमेदवार उदयकुमार यांना निवडणुकीत आर्थिक मदत केली होती. ग्रीनपीसने अणुऊर्जाविरोधी निदर्शने केली. प्रकल्प बंद पाडण्यासाठी संपूर्ण जोर लावला. या बदल्यात संस्थेला 45 कोटींचा विदेशी निधी मिळाला. संस्था विदेशी कार्यकर्त्यांकडून बेकायदेशीरपणे मदत मिळवत असल्याचाही आरोप आहे.