आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थव्यवस्थेचे अच्छे दिन, अडीच वर्षांनी विकासदराची झेप ५.७ टक्के

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दीर्घकालीनमरगळीनंतर अर्थव्यवस्थेने वेग घेतला आहे. शुक्रवारी जारी आकड्यांनुसार या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) आर्थिक वृद्धी दर ५.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. २०१३-१४ च्या पहिल्या तिमाहीत तो ४.७ टक्के तर जानेवारी-मार्च ितमाहीत ४.७ टक्के होता. अडीच वर्षांपूर्वी २०११-१२ (ऑक्टोबर-डिसेंबर)मध्ये तो ६.७ टक्के होता. विश्लेषक विकासदरातील वाढीसाठी यूपीए सरकारच्या अखेरच्या महिन्यांत झालेल्या गुंतवणुकीलाही श्रेय देतात.

उत्पादन
उणे १.२-अधिक ३.५%
अर्थ : मॅन्युफॅक्चरिंगमध्येकामगिरी वाईट होती. आता वाढ झाली आहे. म्हणजे औद्योगिक वाढ होत आहे.

खाण
उणे ३.९ ते अधिक २.१%
अर्थ उद्योगांतखनिजांची मागणी वाढत आहे. अर्थ हा आहे की उद्योगाला भविष्यात चांगल्या विक्रीचा विश्वास.

वीजगॅस
३.८ पासून वाढून १०.२%
अर्थ गुंतवणूकआणि अर्थव्यवस्थेमध्ये पुलाचे काम. कामगिरीवर उद्योग क्षेत्रात चांगली भावना.

बांधकाम
१.१ पासून वाढून ४.८%
अर्थ : रिअॅल्टीसेक्टरमध्ये सुधारणा. देशांतर्गत आणि व्यावसायिक रिअॅल्टीत विक्री आणि विचारणा वाढली.

कठीण काळातून बाहेर
'देशासमोरील कठीण काळ आता मागे पडला आहे. आम्ही आता रनवेवर आहोत आणि लवकरच देश पुन्हा नव्या उंचीकडे जाईल.'
-पंतप्रधान नरेंद्र मोदी (जपानीपत्रकारांशी बोलताना)

जीडीपी

जगात आम्ही १० व्या क्रमांकावर
१. अमेरिका २. चीन ३. जपान ४. जर्मनी ५. फ्रान्स १०. भारत

>१० तिमाहींनंतर मिळाला वेग

>गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हा दर होता ४.७ टक्के

यांनी आणले अच्छे दिन
वित्तीय सेवा : १२.९ पासून १०.४ टक्क्यांपर्यंत घट

येथे पडलो मागे
पण जास्त नाही. सध्याच्या वातावरणात १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ चांगली म्हटली जाऊ शकते.

कृषी : ४.०पासून ३.८ टक्के : किरकोळ घट. उत्पादन, एफएमसीजी आणि वित्तीय सेवांमधील मागणी पाहता सुधारणेचे संकेत आहेत.

सोमवारी शेअर वाढीसह उघडणे शक्य

बाजार: (ऑटो) कॅपिटल गुड्स आणि खाण शेअरमध्ये तेजी शक्य.