आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदींना अंमलबजावणी संचालनालयाने बजावली नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएलमध्ये कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले माजी कमिशनर ललित मोदी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. या नोटिसीचे उत्तर देण्यासाठी तीन आ‌‌ठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. २००८ मधील आयपीएलचे ४२५ कोटी रुपयांचे दूरचित्रवाणी प्रक्षेपणाचे अधिकार देण्यासंबंधीच्या प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे.
२०१० मध्ये ईडीने हे प्रकरण दाखल केले होते. यापूर्वी ईडीने बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जबाब नोंदवला होता. ईडीने मोदी आणि इतरांविरुद्ध परदेशी चलन कायदा उल्लंघनाचे ९ गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणी ललित मोदींची थेट चौकशी न करताच नोटीस आणि दंडाची रक्कम ईडीकडून ठरवली जाण्याची शक्यता आहे.