आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Money Laundering Case ED Summons Himachal Pradesh CM Virbhadra Singh

वीरभद्र सिंह यांना ईडीकडून समन्स, पुढल्या महिन्यात हजर राहावे लागणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मनी लाँडरिंगच्या प्रकरणात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची चौकशी होणार आहे. त्यासाठी त्यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हजर राहण्याची नोटीस अंमलबजावणी संचालनालयाने बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

गुंतवणूक, संपत्ती आणि आयकरशी संबंधित दस्तऐवजांसह त्यांना हजर राहण्याचे समन्स ईडीने पाठवले आहे. सीबीआयच्या तक्रारीनंतर याच महिन्यात ईडीने सिंह यांच्या विरोधात खटला दाखल केला होता. हे समन्स मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत जारी करण्यात आले आहे. कोणत्याही कारणाने सिंह हजर राहू शकत नसल्यास त्यांच्या वतीने वकील दस्तऐवज दाखल करू शकतो. तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाल्यानंतर सिंह यांचा जबाब नोंदवला जाईल. अशाच प्रकारचे समन्स त्यांच्या सहकाऱ्यांनाही पाठवण्यात आले आहेत. सिंह यांच्यावर २००९ ते २०११ दरम्यान केंद्रीय इस्पात मंत्री असताना उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांच्या अतिरिक्त सहा कोटींहून अधिक संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. सीबीआय त्याचा तपास करत आहे. सप्टेंबरमध्ये दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात सिंह यांच्या मालमत्तांवर छापे मारण्यात आले होते. दरम्यान, ही प्रकरणे उकरून काढून केंद्र सरकार आपल्यावर सूड उगवण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तवात केंद्राकडून तपास यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप वीरभद्र यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तपास यंत्रणेचा अकारण दुरुपयोग होत आहे.