आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षित आमदारांची संख्या मध्य प्रदेशात सर्वाधिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली म्हणायला राजधानी आणि महानगर आहे. मात्र येथील नवनिर्वाचित आमदारांचे शिक्षण इतर चार राज्यांतील आमदारांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. शिकलेल्या-सवरलेल्या आमदारांच्या संख्येत मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. विधानसभा निवडणूक निकालांचे विश्लेषणातून कळते की, मध्य प्रदेशातील 230 पैकी 155 (67 टक्के) आमदार पदवीधारक आहेत. राजस्थानच्या 199 पैकी 125 (63 टक्के), छत्तीसगडमधील 90 पैकी 53 (59 टक्के) आमदार ग्रॅज्युएट आहेत. दुसरीकडे, दिल्लीतील 70 पैकी फक्त 36 (51 टक्के) आमदारांना पदवी मिळवू शकलेले आहेत. दरम्यान, चारही राज्यांतील मुख्यमंत्री मात्र उच्चशिक्षित आहेत. यात दिल्लीतील भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हर्षवर्धन हे नाक, कान, घसारोग शल्यचिकित्सक (ईएनटी सर्जन) आहेत. आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल हे तर आयआयटीतील पदवीधर आहेत. तसेच ते भारतीय महसूल सेवेचे माजी अधिकारी आहेत.
छत्तीसगडमध्ये तिस-यांदा सत्ता राखणारे भाजपचे रमणसिंह आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. मध्य प्रदेशात हॅट्ट्रिक नोंदवणारे भाजपचे शिवराजसिंह चौहान पदव्युत्तर आहेत. राजस्थानमध्ये भाजपच्याच वसुंधरा राजे सिंधिया याही ग्रॅज्यूएट आहेत.
10 पैकी 8 आमदार भरतात नियमितपणे आयकर
चार राज्यांतील निवडणुकांत निवडून आलेल्यांतून 10 पैकी 8 आमदार नियमितपणे आयकर भरतात. या यादीत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. येथील 63 आमदार (90 टक्के) आयकर अदा करतात. राजस्थानातील 172 (87 टक्के), मध्य प्रदेशातील 177 (77 टक्के) व छत्तीसगडमधील 63 (70 टक्के) आमदार आयकर भरतात.
आम आदमी पार्टीचेही तीन आमदार डागाळलेले
आम आदमी पार्टीही निष्कलंक नाही.आपच्या तिघांसह 25 दिल्लीकर आमदारांवर गुन्हेगारी तक्रारी आहेत. राजस्थानचे 36, छत्तीसगडचे 15 व मध्य प्रदेशचे 72 आमदार गुन्हेगारी खटल्यांचा सामना करत आहेत. मध्य प्रदेशातील 45, दिल्लीतील 20, राजस्थानच्या 19 व छत्तीसगडच्या 8 आमदारांवर गंभीर गुन्हेगारी तक्रारी दाखल आहेत.