आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय शिक्षण महागले; कुटुंबे झाली छोटी, लोकांचा भर एकाच अपत्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एकेकाळी सरकारने "हम दो, हमारे दो' अभियान राबवले. उद्देश होता देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणणे. हळूहळू कुटुंबाचा आकार तीनवरून दोनवर आला. आता हा ट्रेंड "हम दो, हमारा एक'पर्यंत येत अाहे.

मात्र, त्यामागे हे घोषवाक्य नव्हे तर महागणारे शालेय शिक्षण आहे. तेही विशेषकरून मोठ्या शहरांत. उद्योग संघटना असोचेमने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. त्यानुसार, गेल्या दहा वर्षांत शालेय शिक्षणाचा खर्च तब्बल १५० टक्क्यांनी वाढला आहे. २००५ मध्ये एका अपत्याच्या शिक्षणावर वार्षिक ५५ हजार रुपये खर्च व्हायचा. तो आता सव्वा लाख रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे एकापेक्षा जास्त मुले नकोच, असा विचार जोडपी करत आहेत. आधी मूल झाल्याच्या एक-दोन वर्षांनंतर शालेय शिक्षणाचे नियोजन केले जायचे. आता भावी आई-वडिल मूल जन्मायच्या आधीच पैशांची जमवाजमव करतात. कारण प्ले स्कूल्सचीच फीस आता ३५ ते ७५ हजार रुपयांवर पोहोचली आहे.

मुलांच्या शिक्षणावर खर्च होते ३० ते ४० टक्के कमाई
असोचेमने हा सर्व्हे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, अहमदाबाद, चंदीगड, लखनऊ आणि देहरादूनसह १० शहरांत केला. त्यात १६०० दांपत्यांना प्रश्न विचारले. १० पैकी ९ म्हणजे ९० टक्के लोकांनी शाळेची वाढती फीस ही सर्वात मोठी अडचण असल्याचे सांगितले. ७० टक्के दांपत्यांच्या पगाराचा ३० ते ४० टक्के वाटा हा मुलांच्या शिक्षणावरच खर्च होत असल्याचेही सर्व्हेत समोर आले आहे.

वार्षिक सरासरी शाळेचा खर्च
या वस्तूंवर एक मूल दोन मुले
ट्यूशन फी, ट्रान्सपोर्ट 35000 65000
बिल्डिंग फंड 25000 40000
ड्रेस/शूज 6000 12300
बॅग, बॉटल 1500 3000
बुक्स/स्टेशनरी 8400 17000
इतर खर्च 13,500 25,500

ट्यूशन व कोचिंग
लेव्हल एक मूल दोन मुले
प्राथमिक 5000 10000
माध्यमिक 25000 50000

एक्स्ट्रा अॅक्टिव्हिटी खर्च
प्राथमिक 3000 5000
माध्यमिक 8000 10000

लोकसंख्येचा ट्रेंड
>1952 ते 1980 पर्यंत कमीत कमी तीन वा जास्त मुले
> 1980 ते 2000 दरम्यान १ वा २ मुले असलेल्या कुटुंबांची संख्या ६५% झाली.
> 2000 ते 2014 पर्यंत एकच अपत्याचा ट्रेंड १०% वाढला.
बातम्या आणखी आहेत...