आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Educational Qualification Of Leaders Of Our Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यांच्या पदवीवरून उठले होते वादळ, वाचा कोणते नेते किती शिकलेले?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोठी मोठी आश्वासने देणारी आणि प्रेरणादायी अशी भाषणे करण्यामध्ये राजकारणी लोकांचा हातखंडा असतो. पण त्याचप्रमाणे वचन तोडणे आणि फक्त इलेक्शनपुरते चमकणे यासाठीही त्यांची चर्चा होत असते. पण काही असे मोजकेच नेते असतात जे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेसाठी ओळखले जातात.
राजकारण्यांमध्ये शिक्षणाचा विचार करता मोठ्या प्रमाणावर विषमता आढळून येते. यात काही नेते अगदीच उच्चशिक्षित असल्याचे आपल्या लक्षात येईल. तर त्याच प्रमाणे काही नेते हे अगदीच त्रोटक शिक्षण घेतलेले असतात. अशाच काही नेत्यांबाबत या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही माहिती देणार आहोत.

स्मृती इराणी
स्मृती इराणी यांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण होली चाइल्ट ऑक्सिलियम स्कूलमध्ये जाले. त्यानंतर त्यांना काही कारणास्तव शिक्षण सोडावे लागले. त्यांनी स्वतःच त्यांच्या शिक्षणाबाबत दोन वेगळ्या प्रतिज्ञापत्रांमध्ये वेगळी वेगळी माहिती दिली आहे. 2004 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या त्या कला शाखेच्या पदवीधर (B.A, 1996) असल्याचे सांगितले होते. त्यानंतर 2014, मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठात कॉमर्सच्या पदवीचा एक पार्ट पूर्ण केल्याचे सांगितले होते.

दरम्यान, शालेतून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी 2013 मध्ये प्रवेश घेतला होता, पण प्रत्यक्ष परीक्षा मात्र दिली नव्हती असे एका वृत्तपत्रातून समोर आले.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर नेत्यांच्या शिक्षणाबाबत..