आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देशांकात तब्बल ४८६ अंकांची उसळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पाचे शेअर बाजारात बुधवारी जोरदार स्वागत करण्यात आले. निर्देशांकात तब्बल ४८६ अंशांची वाढ झाली.
 
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांत १० हजार कोटी रुपये गुंतवण्याच्या अर्थसंकल्पातील तरतुदीचे शेअर बाजाराने स्वागत केले. सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा २८,००० आणि ८,७००० ची पातळी गाठली. ऑक्टोबर २०१६ नंतर एकाच दिवसांतील ही मोठी वाढ आहे. अर्थसंकल्प सादर होत असताना सेन्सेक्स हळूहळू वाढत गेला आणि दिवसअखेर तो ४८५.६८ अंकांनी वाढून २८,१४१.६४ वर स्थिरावला. निफ्टीतही १५५.१० अंकांची वाढ होऊन तो ८,७१६.४० वर स्थिरावला. पुढील आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांत १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि सिंडिकेट बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांत ५.६४ टक्क्यांची वाढ झाली.
बातम्या आणखी आहेत...