आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JNU मध्ये NSUI च्या सदस्यांनी दसऱ्याला जाळला मोदी आणि शहांचा प्रतिकात्मक पुतळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) परिसरात विजयादशमीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या प्रतिकृती असलेला रावण दहन करण्‍यात आल्याची घटना घडली. रावणाच्या दहा शिरांवर अमित शाह, नाथूराम गोडसे, रामदेव, महंत आदित्यनाथ, आसाराम आणि साध्वी प्राची आदींचे फोटो लावण्यात आले होते. हा प्रकार जेएनयूच्या काँग्रेसच्या स्टूडेंट विंगने केला आहे.

'असत्यावर सत्याचा विजय झाल्याशिवाय राहाणार नाही', असे घोषवाक्याचे पोस्टर्स विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी चिटकवले होते. रावण दहन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदींसह भाजपच्या नेत्यांविरोधत घोषणाबाजी केली.

मुस्लिम स्टूडेंट्सला टार्गेट केल्याचा आरोप...
- जेएनयू कॅम्पसमधील सरस्‍वती ढाब्याजवळ पंतप्रधान आणि इतर भाजपच्या नेत्यांच्या प्रतिकृतीचा रावण दहन करण्यात आला.
- जेएनयूमधील NSUIच्या शाखेचे माजी अध्यक्ष सनी धीमान यांनी सांगितले की, मोदी खोटारडे आहेत. देशातील जनतेची ते फसवणूक करत आहे. त्याच्या या वृत्तीच्या पुतळ्याचे आम्ही दहन केले आहे.
- धीमान यांनी सांगितले की, कुलगुरुंच्या माध्यमातून जेएनयूमधील मुस्लिम विद्यार्थ्यांना टार्गेट केले जात आहे. याचा निषेध म्हणून आम्ही विजयादशमीच्या दिवसाची वाट पाहात होतो. याच दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये बौद्ध धर्म स्विकारला होता.
- एनसयूआयचा सदस्य मसूद याने म्हटले की, होय, आम्ही मोदी सरकारचा निषेधकेला आहे. देशात 'प्रो-स्‍टूडेंट' आणि 'प्रो-पीपल' अशी एक व्यवस्था असायला हवी.

ABVP ने केला विरोध मात्र SFI चा पाठिंबा...
- भाजपची विद्यार्थी संघटना एबीव्हीपीचे सदस्य सौरभ शर्मा यांनी सांगितले की, एनएसयूआय इतक्या खालच्या स्तराला जाईल, याची कल्पना नव्हती. देशात 1984 मध्ये उसळलेल्या दंगलीच्या आरोपींच्या पुतळ्याचे दहन करायला हवे होते. एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांच्या कृत्याचा निषेध करतो असेही सौरभ शर्माने म्हटले आहे.
- एसएफआयचे अध्यक्ष वलीउल्ला खां कादरी यांनी सांगितले की, एनएसयूआयला आम्हा पाठिंबा आहे. लोकशाहीत प्रत्येकाला विरोध करण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे जनता नाराज आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, घटनेेचा व्हिडिओ आणि फोटोज...
बातम्या आणखी आहेत...