नवी दिल्ली - रामायणामध्ये उल्लेखित मृगनयनी (कपिला), महाभारतामध्ये उल्लेखित मयूरपंखी (शंखवार) यांच्यासह बांग्ला, रथी, देवली, मेवाती, मालवी, नागौरी, थारपकड, ककरौल, हरियाणवी, अंगौल, सिंधी, धन्नी, पहाडी, श्यामा आिण सहिवाल यांच्यासारख्या गायींच्या भारतीय प्रजाती वाचवण्यासाठी नवी दिल्लीतील राधाकृष्ण मंदिरातील गोशाळा मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. गोशाळेचे महंत राममंगल दास यांनी सांगितल्याप्रमाणे, भगवान श्रीकृष्णाच्या युगात गायीच्या ६४ प्रजाती अस्तित्वात होत्या. सध्या यापैकी फक्त ३२ प्रजातीच शिल्लक आहेत. या प्रजाती वाचवण्यासाठी गोशाळेत शास्त्रीय तसेच प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. मात्र, गायीच्या देखरेखीसाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे बऱ्याचदा अडचणी येत आहेत. त्यांनी सांिगतले की, भारतात सध्या मन्सुरी (लांब शिंगाची गाय), अमृत महाल (म्हैसूर), हल्दीकर (म्हैसूर), कंगायम, खिलकरी, बलगुड (कोईम्बतूर), कृष्णावेली (मुंबई, हैदराबाद, दक्षिणी भारत) या प्रजाती खूप कमी प्रमाणात दिसून येत आहेत. ६ वर्षांपूर्वी जयपूरच्या राजाने या गोशाळेला एक कामधेनू गाय भेट दिली होती, असे महंतांनी सांगितले. या गायीचे वय सध्या २० वर्षे असून तिला आजारी अवस्थेत गोशाळेत देण्यात आले होते. सध्या ती तंदुरुस्त आहे. याचप्रमाणे त्यांच्याकडे रिद्धी आणि सिद्धी नामक दोन कपिला गायी आहेत. या गायीची त्वचा आणि डोळे हरणाप्रमाणे असल्याने तिला ‘मृगनयनी’ असे म्हटले जाते. या गोशाळेत अनेक प्रकारच्या दुर्मिळ प्रजाती उपलब्ध असून यात पाठीवर चंद्र असलेली चंदा, मोरपंखी त्वचा असलेली शंखवार इत्यादींचा समावेश आहे.
दुर्मिळ होत असलेली कामधेनू गाय
कपाळावर चंद्राची आकृती असलेली चंद्रा गाय. या प्रजातीच्या गायीदेखील खूप कमी पाहावयास मिळतात.
राधाकृष्ण मंदिरात दुर्मिळ समजल्या जाणा-या मृगनयनी गायींसह मंदिराचे महंत राममंगल दास.