आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहानवाज हूसैनच्या घरी साजरी झाली ईद, अडवाणी-जेटली-राजनाथ यांनी दिल्या शुभेच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे नेते शहानवाज हुसैन यांच्या घरी आज ईद उल फित्रच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपच्या कार्यक्रमांमध्ये फारसे न दिसणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह अनेक मंत्री आणि पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी शहानवाज हुसैन यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

> लालकृष्ण अडवाणींनी शहानवाज हूसैन यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी हैसन यांच्या मुलाची आस्थेवाईक चौकशी केली.
> हुसैन यांच्या पत्नी प्रत्येक पाहुण्यांचे विचारपुस करत असताना दिसल्या. त्यांनी पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. त्याचे काठ हे भाजपच्या झेंड्यातील भगव्या आणि हिरव्या रंगाचे होते. तर, शहानवाज हुसैन नळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये होते.
बातम्या आणखी आहेत...