आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम ज्येष्ठ नागरिकासोबत दिल्ली मेट्रोत गैरवर्तन, तरुण म्हणाले- पाकिस्तानात चालते व्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत एका वयोवृद्ध मुस्लिम व्यक्तीसोबत गैरवर्तन आणि भेदभाव झाल्याची घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी जागेवरुन वाद घालत ज्येष्ठ नागरिकाला अर्वाच्च भाषा वापरली. एवढेच नाही तर, 'पाकिस्तानात चालते व्हा, तिथे जागा मागा' असे सुनावले. एका महिला कार्यकर्तीने गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचा उल्लेख आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. 
 
ही जागा भारतीयांसाठी...
- मीडिया रिपोर्टनुसार, महिला अधिकारांसाठी लढणाऱ्या कविता कृष्णन यांनी फेसबुक पोस्टद्वारे या घटनेला जगासमोर आणले आहे. 
- कविता यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, दोन्ही मुले ज्येष्ट नागरिकांसाठी राखीव जागेवर बसलेले होते. तिथे एक ज्येष्ठ मुस्लिम व्यक्ती आले आणि त्यांनी जागा देण्याची विनंती केली, मात्र तरुणांनी त्यांना सपशेल नकार दिला. जेव्हा वयोवृद्ध व्यक्तीने पुन्हा विनंती केली तेव्हा दोन्ही तरुण त्यांना म्हणाले, 'ही जागा भारतीयांसाठी आहे, तुमच्यासारख्या पाकिस्तानींसाठी नाही. तुम्हाला जर बसायचेच असेल तर पाकिस्तानात जा आणि तिथे जागा मागा.'
 
मध्यस्थी करणाऱ्याची पकडली कॉलर 
- फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, की ऑल इंडिया सेंट्रल कॉन्सिल ऑफ ट्रेड यूनियन्सचे राष्ट्रीय सविच संतोष रॉय हे देखिल त्या मेट्रोने प्रवास करत होते. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. रॉय यांनी तरुणांना त्यांच्या गैरवर्तनाबद्दल माफी मागण्यास आणि मुस्लिम वृद्धास जागा देण्यास सांगितले त्यालाही तरुणांनी नकार दिला. त्यासोबतच वाद निवळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॉय यांची कॉलर पकडून त्यांनाच धमकावले. तुम्ही देखील पाकिस्तानात जा, असे रॉय यांनाही तरुणांनी सुनावले.         
  
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...