भोपाळ- वयोवृद्ध आई-वडिलांशी न बोलणे हे सुद्धा कौटुंबिक हिंसा किंवा छळाच्या श्रेणीत मोडते. आई- वडिलांची सेवा करणे, आरोग्य व देखभाल करणे ही मुलांची नैतिक जबाबदारी आहे. मुलाने त्यांच्याकडे लक्ष दिलेच पाहिजे, असे मत मध्य प्रदेशातील एका स्थानिक कोर्टाने एका सुनावणीदरम्यान व्यक्त केले. मध्य प्रदेशातील 72 वर्षीय रमादेवी यांनी पती छोटेलाल, मुलगा मनोज आणि विष्णू यांच्याविरोधात कौटुंबिक छळ कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणात कोर्टाने आदेश दिला आहे, की रमादेवी यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या पालनपोषणासाठी महिन्याकाठी 1500-1500 असे तीन हजार द्यावेत. याचबरोबर रमाबाईंची तक्रार होती, की पती छोटेलाल व मुले मला त्रास देतात व बोलतही नाहीत. यावेळी कोर्टात मत मांडले, की वयोवृद्ध आई-वडिलांशी न बोलणे हे सुद्धा कोटुंबिक हिंसा व छळाच्या श्रेणीत मोडते.