आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Foreign Tour Increased By 900 Fold, Lets Spend Money Not Right

निवडणूक आयोगाचा परदेशवारीचा खर्च 900 पटींनी वाढला, \'होऊ दे खर्च\' वृत्ती धक्कादायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजकीय पक्षांना नियंत्रणात ठेवणा-या निवडणूक आयोगाचा परदेशवारीचा खर्च मात्र गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढला आहे. ही वाढ 900 पटींनी झाली आहे. निवडणूक आयुक्त व त्यांच्या कर्मचा-यांची ‘होऊ दे खर्च’ वृत्ती सामान्य नागरिकांसाठी धक्कादायक आहे.
माहिती हक्क अर्जातून ही माहिती पुढे आली आहे. त्यात आयोगाच्या एकूण खर्चाचा ताळेबंद मांडण्यात आला. एस.सी. आग्रवाल यांच्या अर्जावर सरकारकडून ही माहिती देण्यात आली. देशांतर्गत व परदेशवारीचा खर्चही त्यात नमूद करण्यात आला आहे. देशांतर्गत खर्चातही मोठी वाढ झाल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी यांनी सर्वाधिक परदेश दौरे केले. 2008-12 या कालावधीत त्यांनी परदेशवारीवर खूप खर्च केल्याचे माहिती हक्काच्या अर्जावरील माहितीमधून स्पष्ट झाले आहे. चार वर्षातील हे दौरे आयोगाला चांगलेच खर्चात टाकणारे ठरले होते. कुरेशी यांनी अमेरिका, थायलंड, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, चिली, ब्रिटन, जॉर्डन, दक्षिण कोरिया, रशिया, ब्राझील, सौदी अरेबिया, बेल्जियम, पाकिस्तान, भूतान, इंडोनेशिया, नायजेरिया, केनिया या देशांना कुरेशी यांनी आपल्या कारकीर्दीत भेट दिल्याचेही स्पष्ट झाले. त्यांच्यानंतर अक्षय राऊत यांचा नंबर लागतो. राजकीय पक्षांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवणा-या निवडणूक आयोगाने स्वत: मात्र परदेशवारीवर अनाठायी खर्च केल्याचे अर्जावरून स्पष्ट झाले आहे.
दौ-यात काय केले ?
परदेशी दौरे करून आयुक्त किंवा कर्मचा-यांनी काही व्याख्यानांना हजेरी लावली. द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली, इतर देशांच्या निवडणूक प्रक्रियेत निरीक्षक
म्हणून सहभाग. त्याचबरोबर विविध बैठकांना हजेरी.
परदेशी ताळेबंद
वर्ष खर्च
2008-09 8.33 लाख
2011-12 74.86 लाख.
2012-13 62.98 लाख.
घरगुती(--?--) खर्च
2008-09 63.86 लाख.
2012-13 70.80 लाख.
कोणाचे किती दौरे ?
> एस.वाय. कुरेशी 23
माजी मुख्य निवडणूक आयुक्त
> अक्षय राऊत 18
पॅनल महासंचालक
> नवीन चावला 04
माजी मुख्य निवडणूक आयुक्त
> व्ही. एस. संपत 10
माजी मुख्य निवडणूक आयुक्त
> एच. एस. ब्रह्मा 05
सगळे काही नियमानुसार
माजी आयुक्त, कर्मचा-यांचे हे दौरे त्यांच्या मनमानी पद्धतीने झालेले नाहीत. त्यांनी आपले दौरे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याला कायदा विभाग, परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, एफसीआरए विभागांचीही सहमती असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण त्यांच्या मंजुरीनंतरच हे दौरे शक्य झाले.