आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Get Four Days Bye Rahul Gandhi

वादग्रस्त वक्तव्य: राहुल गांधींना उत्तरासाठी चार दिवसांचा अवधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना वादग्रस्त वक्तव्याचा खुलासा करण्यासाठी चार दिवसांचा अवधी दिला आहे. राहुल गांधींनी त्याआधी आयोगाकडे सात दिवस मागितले होते. मुजफ्फरनगरमधील दंगलग्रस्त मुस्लिम तरुणांशी ‘आयएसआय’ संपर्कात असल्याचे वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. या वक्तव्यामुळे देशभरात वादळ उठले होते तसेच भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली होती.

निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटीसनंतर काँग्रेसने त्याला कायदेशीर उत्तर दिले जाईल, असे म्हटले होते. परंतु, राहुल गांधी यांनी सण उत्सवाचे कारण देत निवडणूक आयोगाकडे आठ दिवसांचा वेळ मागितला होता. आयोगाने वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींना नोटीस पाठवून 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते.