आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Give Warning To Kejriwal Over Code Of Conduct

निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पत्रके वाटल्याप्रकरणी केजरीवाल यांना आयोगाची तंबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी पत्रके वाटल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना तंबी दिली आहे.विशिष्ट समुदायाच्या मतदारांना आवाहन केल्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून यापुढे प्रचारावेळी खबरदारी बाळगण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. निवडणुकीच्या प्रचारावेळी मुस्लिम मतदारांना धार्मिक आधारावर आवाहन करणारी पत्रके ‘आप’ने वाटली होती. मुस्लिम मतदारांना आतापर्यंत पर्याय नव्हता. आपच्या रूपाने प्रामाणिक पर्याय मिळाला आहे, असे आवाहन या पत्रकात करण्यात आले होते.
याविरोधात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांचे पुत्र हरीश खुराणा यांनी तक्रार दिली होती. याप्रकरणी आयोगाने केजरीवाल व आपकडून खुलासा मागवला होता. केजरीवाल यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने आयोगाने त्यांना तंबी दिली. मते मिळवण्यासाठी आपने आचारसंहितेच्या परिशिष्ट 1 मधील उपपरिशिष्ट 3 चे उल्लंघन केल्याचे आयोगाने म्हटले आहे. या परिशिष्टानुसार धार्मिकतेच्या आधारावर मतदानाचे आवाहन करण्यास प्रतिबंध करण्यात
आला आहे.