आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Issued Guidelines For Campaign On Social Media News In Marathi

सोशल मिडीयावर प्रचार करण्यापूर्वी निवडणूक आयोगाची मंजुरी आवश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सोशल मिडीयावर निवडणूक प्रचाराच्या मुद्यावर निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतली आहे. आता इंटरनेटवर प्रचार करण्यापूर्वी राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल. फेसबुकसह सर्व सोशल वेबसाइट्सवर सध्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी आयोगाने सोशल वेबसाइट्सच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रचारासाठी काही नियम जारी केले आहेत.या नियमांच्या संदर्भात निवडणूक अधिकारी आणि सोशल साईट्स यांना आयोगाने पत्र पाठवले आहे.

आयोगाने तयार केलेले नियम
- राजकीय पक्ष आणि उमेदवाराला निवडणूक प्रचाराशी संबधित कोणतेही माहिती सोशल मिडीयावर अपलोड करण्यापूर्वी आयोगाची परवानगी घ्यावी लागेल.

- जर एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवाराने परवानगी न घेता माहिती अपलोड केली तर सोशल वेबसाईट्स ती माहती काढून टाकतील.

- पक्ष आणि उमेदवाराला सोशल मिडीयावर माहिती अपलोड करण्यासाठी किती खर्च आला, याची माहिती आयोगाला द्यावी लागेल.

- पक्षाने आणि नेत्यांनी सोशल मिडीयावर अपलोड केलेली माहिती कायदेशीरपणे योग्य आणि कोणाच्याही भावनांना ठेस पोहोचवणारी नसेल याकडे सोशल साईट्सने बारकाईने लक्ष द्यावे. अयोग्य आणि चुकीची माहिती साईट्सवर असल्यास त्वरित काढून टाकण्यात येईल.

- उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथप्रत्रासोबत आपल्या सोशल मिडिया अकांउट्सची माहिती देणे आवश्यक आहे.