आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission May Go For Six Phase Poll In April May

लोकसभा निवडणूक एप्रिल-मे महिन्यात सहा टप्प्यात, 18 मेला कळणार देशाचा कौल?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणूक अपेक्षेप्रमाणे एप्रिल- मे महिन्यांतच पार पडणार आहे. देशभरात एकूण सहा टप्प्यात मतदान होईल. लोकसभेच्या निवडणुकीबरोबर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्याच्या विधानसभा निवडणुकाही होतील.

एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 15 मे पर्यंत मतदानाची प्रक्रिया संपलेली असेल व 18 मे रोजी रविवारी निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ शकतात. लोकसभेचा कार्यकाळ 31 मे रोजी समाप्त होत आहे. त्यापूर्वीच नवे स्थापन करण्यात येईल. यासाठीची निवडणूक आयोगाने प्राथमिक पातळीवर संपूर्ण तयारी केली असून, लोकसभेसाठी 3 मार्चला आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिका-यांच्या माहितीनुसार 6 ते 10 मार्च दरम्यान निवडणुकीची घोषणा होऊ शकते. निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू होते.
81 कोटी 40 लाख मतदार- लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी व सुरक्षेसाठी 20 हजार जवान तैनात करण्यात येतील. यंदाच्या लोकसभेत सुमारे 81 कोटी 40 लाख मतदार मतदान करू शकणार आहेत. जे 2009 च्या तुलनेत 9 कोटी 70 लाख अधिक मतदार आहेत.
उमेदवार आता 40 नव्हे 70 लाख खर्च करू शकणार- निवडणूक आयोग उमेदवाराच्या खर्चात वाढ करण्याचा विचार करीत आहेत. दहा लाख लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आजच्या महागाईच्या काळात 40 लाख रूपये अपूर्ण पडतात. अशा तक्रारी आयोगाकडे गेल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोग याबाबत सकारात्मक विचार करीत आहे. लोकसभेसाठी उभे राहणारा उमेदवार यापुढे 70 लाख रूपये खर्च करू शकणार आहे. आतापर्यंत उमेदवार 40 लाख रूपये खर्च करू शकत होता. विधानसभेच्या बाबतीतही तसी मागणी होत होती. विधानसभेसाठी उमेदवार आता 16 वरून 28 लाख रूपये खर्च करू शकणार आहे. कायदा मंत्रालय लवकरच याबाबत घोषणा करू शकते.