आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भलतीसलती आश्वासने देऊ नका’, निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना दिशानिर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मते मिळवण्यासाठी ऊठसूट भलती आश्वासने देणार्‍या राजकीय पक्षांच्या घोषणापत्रांवर आता निवडणूक आयोग करडी नजर ठेवणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने दिशानिर्देशही जारी केले आहेत. प्रत्यक्षात पूर्तता करता येणार नाही अशी आश्वासने देऊ नका, असे आयोगाने स्पष्टपणे बजावले आहे.
आयोगाने या दिशानिर्देशांमध्ये 7 फेबु्रवारीला राजकीय पक्षांसोबत झालेल्या बैठकीतील निर्णयांचाही समावेश केला आहे. या निर्णयांना आदर्श आचारसंहितेचाच एक भाग करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने दिशानिर्देशांचा मसुदा तयार केला होता. राजकीय पक्षांसोबत त्यावर चर्चाही केली होती. मात्र त्यावर राजकीय पक्षांनी वेगवेगळी मते व्यक्त केली होती.
योजनेसाठी पैसा कुठून येणार, याचीही माहिती द्या
दिशानिर्देशांत म्हटले आहे की, निवडणूक उमेदवार वा राजकीय पक्ष जर एखादी घोषणा करत असेल तर त्यात पारदर्शकता बाळगली जावी. आपल्या योजना वा आश्वासनाच्या पूर्ततेसाठी पैसा कुठून येईल, हेही त्याला स्पष्ट करावे लागेल. पूर्तता करता येतील अशीच आश्वासने मतदारांना द्यावी. मतांवर डोळा ठेवून भलती आश्वासने देऊ नये.
निवडणूकपूर्व स्थितीचा आढावा
सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाने सुरक्षा व इतर पूर्वतयारीच्या आढाव्यासाठी उच्च्स्तरीय बैठक घेतली. यात सर्व राज्यांचे मुख्य सचिव व पोलिसप्रमुखांनी भाग घेतला होता. बैठकीत पोलिस महासंचालकांसोबत सुरक्षा व्यवस्था, तर परिवहन सुविधेबाबत पोलिस महासंचालकांसोबत चर्चा करण्यात आली.