आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Solved 14 Hundred Paid News Cases

देशभरात पेड न्यूजची चौदाशे प्रकरणांचा निवडणूक आयोगाने लावला छडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गेल्या चार वर्षांमध्ये पेड न्यूजच्या 1400 हून अधिक प्रकरणांचा निवडणूक आयोगाने छडा लावला आहे. 17 राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांमधील ही प्रकरणे आहेत.

2010 पासून या वर्षी झालेल्या कर्नाटक निवडणुकांपर्यंतची पेड न्यूजची अधिकृत माहिती निवडणूक आयोगाने सादर केली आहे. त्यानुसार पेड न्यूजची सर्वाधिक 523 प्रकरणे गेल्या वर्षी झालेल्या पंजाबच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आढळली होती. त्यानंतर गुजरातमध्ये 414, हिमाचल प्रदेशमध्ये 104 आणि या वर्षी झालेल्या कर्नाटक निवडणुकांमध्ये 93 पेड न्यूजची प्रकरणे आढळल्याचे या माहितीवरून समोर आले आहे. पैकी बहुतांश प्रकरणे ही प्रस्थापित नेत्यांशी संबंधित आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशात 97, उत्तराखंडमध्ये 30, गोव्यात 9, केरळ 65, तामिळनाडू 22, आसाम 27, पश्चिम बंगाल 8 आणि पुद्दुचेरीत 3 प्रकरणे आढळून आली आहेत. बिहारमध्ये 2010 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये अशी 15 प्रकरणे समोर आली आहेत. आसामव्यतिरिक्त ईशान्येकडील एकाही राज्यात पेड न्यूजची प्रकरणे आढळली नसल्याचेही या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. तसेच त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि मणिपूर या राज्यांमध्येही एकही प्रकरण आढळले नाही, अशी माहिती आयोगाने दिली.