आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 फेब्रुवारीला अर्थसंकल्‍प सादर होण्‍याबाबत संभ्रम, विरोधीपक्षांच्‍या विरोधानंतर बदलू शकते तारीख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - 5 राज्‍यातील निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर एक फे‍ब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसं‍कल्‍पाच्‍या तारखेबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. विरोधीपक्षांनी निवडणुकांच्‍या तारखा जाहिर झाल्‍यानंतर या प्रकरणी निवडणुक आयोगाकडे तक्रार केली होती. फेब्रुवारीमध्‍ये होणाऱ्या 5 राज्‍यातील निवडणुकांमध्‍ये भाजपा या अर्थसंकल्‍पाचा फायदा उचलू शकतो, म्‍हणून अर्थसंकल्‍पाची तारीख पुढे ढकलण्‍यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. याला प्रतिसाद देत निवडणुक आयोगाने याप्रकरणी लवकरच निर्णय घेण्‍यात येईल असे आश्‍वासन राज्‍यांना दिले आहे. 
 
राजकीय पक्षांनी केली मागणी 
मुख्‍य निवडणूक आयुक्‍त नसीम जैदी यांनी सांगितले की, पुढील महिन्‍यात 5 राज्‍यात निवडणूका होत आहेत. यादरम्‍यान अर्थसंकल्‍प सादर केला जाऊ नये अशी मागणी काही राजकीय पक्षांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, निवडणुक आयोग या मागणीचा विचार करीत आहे व लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्‍यात येईल. 

अर्थसंकल्‍पाने मतदारांना प्रभावित करता येईल   
कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, डावे, शिवसेनेसह अन्‍य विरोधी पक्षांनी याबाबत निवडणुक आयोगाकडे दाद मागितली आहे. या पक्षांनी म्‍हटले आहे की, निवडणुकांदरम्‍यान सादर होणारा अर्थसंकल्‍प 5 राज्‍यातील मतदारांना प्रभावित करु शकतो. 
 
निवडणुक आयोग तयार करत आहे दिशा-निर्देश 
सर्वोच्‍च न्‍यायालयाने जाति-धर्माच्‍या नावावर मतदान मागण्‍यास मनाई केली आहे. निवडणूक आयुक्‍त जैदींनी याबद्दल सांगितले की, सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयाचे या निवडणुकीत पालन व्‍हावे म्‍हणून निवडणुक आयोगही तयारी करीत आहे. त्‍यानुसार नियम तयार केले जात आहेत. त्‍यांनी सांगितले की, आयोगाचा विधि विभाग सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयानूसार दिशा-निर्देश बनवत आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निर्णय निवडणुक आयोगाला आणखी मजबुत करेल. जैदी म्‍हणाले, सर्व राजकीय पक्षांनी स्‍वत:हून या निर्णयाचे पालन केले पाहिजे. 
 
धर्माच्‍या नावावर मते मागता येणार नाही 
सर्वोच्‍च न्‍यायालयाने नुकत्‍याच दिलेल्‍या निर्णयानुसार जाती, धर्म, भाषेच्‍या नावावर उमेदवाराने मते मागितल्‍यास त्‍याची निवडणुक रद्द होऊ शकते. आर.पी.अॅक्‍ट 1951मध्‍ये याबद्दल स्पष्‍ट निर्देश दिले आहेत. निवडणुकीमध्‍ये जाती, धर्म, भाषेच्‍या आधारावर मते मागणे बेकायदेशीर आहे. 
 
नोटबंदीमुळे निवडणुकीमध्‍ये काळा पैशांच्‍या वापर होणार कमी 
मुख्‍य निवडणुक आयुक्‍तांनी म्‍हटले आहे की, नोटबंदीनंतर या निवडणुकीमध्‍ये काळया पैशांचा वापर बऱ्याच प्रमाणात कमी होण्‍याची शक्‍यता आहे. मात्र राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्‍यासाठी अन्‍य बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करु शकतात. यामुळे निवडणूक आयोगाचे सर्व उमेदवारांवर बारीक लक्ष असणार आहे. उत्‍तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्‍तराखंड आणि मणिपूर येथे 4 फे‍ब्रुवारीपासून निवडणुका सुरु होत आहे. याची निवडणुक आयोगातर्फे जोरदार तयारी सुरु आहे.  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)    
बातम्या आणखी आहेत...