आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक रणधुमाळीत देशभर ‘सिंग इज किंग’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 16 व्या लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या काही टप्प्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातील उमेदवारी अर्जांत सिंग आडनावाच्या व्यक्तींनी इतरांवर मात केल्याने ‘सिंग इज किंग’ असल्याचा प्रत्यय आला आहे. 543 पैकी 218 मतदारसंघामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष्यांच्या उमेदवारांमध्ये सिंग आडनावाचाच भरणा आहे.

काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीच्या जवळपास 50 उमेदवारांच्या नावाशी सिंग शब्द जोडला आहे. मायावती यांच्या बसप पक्षात 30 पेक्षा जास्त उमेदवारांची नावे सिंगशी संबंधित आहेत.15 व्या लोकसभेतील खासदारांमध्ये कुमार आणि यादव ही सामान्य नावे आहेत. याशिवाय बर्‍याच खासदारांच्या नावात यादव आणि राम ही नावे जोडली गेली आहेत.