आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेसाठी बदलली विचारसरणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - निवडणूक जवळ येताच विविध राजकीय पक्षांत पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. सर्व पक्ष दुसर्‍या पक्षातून आलेल्या नेत्यांना सदस्यतेबरोबरच उमेदवारी देखील देऊ लागले आहेत. आजच्या स्थितीत पक्ष म्हणजे सत्ता मिळवण्याच्या टोळ्या बनल्या. अशा नेत्यांसाठी सत्ता मिळवण्यासाठी पक्ष हे साधन बनले असल्याचे राजकीय विचारवंत के. एन. गोविंदाचार्य यांना वाटते.

कोणत्या पक्षात बाहेरून किती आले ?
- उत्तर प्रदेशात इतर पक्षांतून सर्वाधिक 19 नेते भाजपमध्ये दाखल झाले. त्यानंतर सपा (15), काँग्रेस (7), बसपा (7) आणि रालोद (3) यांचा क्रमांक लागतो. भाजपमध्ये ब्रजभूषण शरणसिंह आणि जगदंबिका पाल दाखल झाल्या. पक्षाने त्यांना तिकीट दिले. रालोदमध्ये अमरसिंह आणि जयाप्रदा सामील झाले आहेत.
- बिहारमध्ये जदयूने 13, भाजपने 10, राजदने04, काँग्रेसने 02, लोजपने 1 जागेवर पक्षांतर केलेल्या नेत्यांना उमेदवार म्हणून उतरवले आहे.
- हरियाणात भाजपमध्ये इतर पक्षातून तीन नेते आले. हरियाणा जनहित काँग्रेसमध्ये एका नेत्याने प्रवेश केला. काँग्रेसचे राव इंद्रजित सिंह भाजपमध्ये गेले आहेत.
- राजस्थान भाजपमध्ये इतर पक्षांतून तीन नेते आले. काँग्रेसमध्ये एक नेता. बाडमेरमध्ये भाजपने ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांना नाराज केले. काँग्रेसचे माजी खासदार कर्नल सोनाराम यांना तिकीट देण्यात आले आहे.
- आंध्रमध्ये मोठे पक्षांतर झाले. माजी केंद्रीय मंत्री डी. पुरंदेश्वरी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे खासदार व्यंकटरामी रेड्डी वायएसआर काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. काँग्रेसचे आमदार तेलुगू देसम पक्षात सहभागी झाले आहेत.
- झारखंडमध्ये झामुमोचे दोन आमदार हेमलाल मुर्मु आणि विद्युत बरन महतो भाजपमध्ये सामील झाले आहेत. पक्षाने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे.
- मध्य प्रदेशात काँग्रेसचे दोन नेते भाजपमध्ये दाखल झाले. भाजपने राव उदय प्रताप सिंहांना होशंगाबाद व भागीरथ प्रसाद यांना भिंडमधून तिकीट दिले.
- छत्तीसगडमध्ये भाजपने नेत्री करुणा शुक्ला काँग्रेसमध्ये सहभागी झाले. त्यांना काँग्रेसने बिलासपूरमधून तिकीट दिले.
- महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी दोन नेते पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यात शिर्डीतील खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणि शिवसेना प्रवक्ते राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. नार्वेकर यांना मावळमधून तिकीट देण्यात आले.