आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिक जेथे असतील तेथेच मतदान : सुप्रीम कोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ज्या ठिकाणी सैनिक तैनात असतील, त्यांना तेथेच मतदान करता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. ज्या मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरू नाही तेथील मतदार यादीत लोकांना नाव नोंदवता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

शांततापूर्ण ठिकाणी जानेवारी 2014 पासून आधीपासूनच तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांची मतदार म्हणून नोंदणी करता येईल. लोकसभा निवडणुकीत सुरक्षा कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मतदानापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही, असे न्या. आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने म्हटले आहे. विद्यमान कायद्यानुसार एखादा सुरक्षा कर्मचारी एखाद्या ठिकाणी तीन वर्षापेक्षा जास्त काळ तैनात असेल तरच तेथे तो मतदान करू शकतो. परंतु ज्या 225 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे, तेथे हा निर्णय लागू होणार नाही. यापूर्वी हरियाणा उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. राजीव चंद्रशेखर यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, ‘प्रश्न केवळ सुरक्षा कर्मचार्‍यांचा नसून त्यांच्या कुटुंबीयांचाही आहे. ते आपल्या मूळस्थानापासून दूर आहेत. ते आपले मतदान करू शकत नाहीत. त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याच्या अधिकारापासूून वंचित ठेवता येणार नाही.’

अडवाणींना रोखले, मोदींनाही रोखणार : लालू
‘राम-राम जपल्यामुळे पीएमची खुर्ची मिळत नाही. या देशात सर्वांना सोबत घेऊन जावे लागते तर जनता सेवा करण्याची संधी देते. 199-च्या आधी दंगली होत होत्या, तेव्हा पाहणारे कोणी नव्हते. पण 199- मध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा अडवाणी आणि अशोक सिंघल यांची रथयात्रा समस्तीपुरात अडवली, आता मोदींनाही मीच अडवणार’, असे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.