आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष-खासदारांच्या निवडणूक खर्चाच्या दाव्यांमध्ये विसंगती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - निवडणूक खर्चाविषयीचा विसंवाद समोर आला आहे. असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर)ने दावा केला आहे की, खासदार आणि राजकीय पक्षांच्या विधानात ताळमेळ नाही. पक्षाच्या खासदारांना जे निवडणूक निधी दिले गेल्याचा दावा पक्षांनी केला आहे त्या आकड्यांत व प्रत्यक्ष दिलेल्या निधीच्या आकड्यांत तफावत आहे. एडीआरने 388 खासदारांच्या निवडणूक खर्चाच्या दाव्यांचे विश्लेषण केले आहे. त्यात 277 खासदार राष्ट्रीय पक्षांचे आहेत.

7.46 कोटी मिळाल्याचा 75 खासदारांचा, तर 14.19 कोटी रुपये खासदारांना दिल्याचा राष्ट्रीय पक्षांचा दावा.

काँग्रेस
- दोन खासदारांना 4.5 लाख, दोन खासदारांना 5-5 लाख, 116 खासदारांना प्रत्येकी 10 लाख, दोन खासदारांना 15-15 लाख आणि एका खासदाराला 25 लाख रुपये दिले आहेत.
- 123 खासदारांना निधी दिलाय. त्यात 81 खासदारांचे दावे दिलेल्या आकड्यांच्या विपरीत आहेत.
- 15 कोटी रुपये प्रणव मुखर्जींना दिले आहेत. मुखर्जींचा दावा आहे की, त्यांना छदाम मिळालेला नाही.
- 33 मंत्र्यांना 3.45 कोटी दिले गेले. त्यात 22 खासदारांनी सांगितले की, पार्टीने रुपयाही दिलेला नाही. फक्त चार मंत्र्यांची वक्तव्ये मिळती-जुळती आहेत.
- 23 खासदारांना 10-10 लाख दिल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. श्रीप्रकाश जायस्वाल, चिदंबरमसह 23 खासदारांनी छदामही मिळाला नसल्याचे सांगितले.

भाजप२ कोणत्याही खासदाराला एका रुपयाचीही मदत केली नाही, परंतु आम्हाला एकूण 2.75 कोटी रुपये मिळाले असा दावा 25 खासदारांनी केला आहे.

माकप
3 खासदारांनी 20.68 लाख रुपये दिले. प्रत्येकास 10 लाखापेक्षा कमी.10 खासदारांना 144.60 लाख रुपये.

प्रादेशिक पक्ष
9 राज्यांच्या 12 पक्षांच्या 15 खासदारांनी पक्षाकडून मदत मिळाल्याचे सांगितले, परंतु आकड्यांचा ताळेबंद जमत नाही.

सुबोधकांत सहाय, ज्योतिरादित्य सिंधिया, मनीष तिवारी, सचिन पायलट आणि बेनीप्रसाद वर्मा यांचे दावे आणि पक्षाच्या दाव्यातही खूप फरक आहे.