आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election News In Marathi, EVM, NOTA, General Election

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच वापरला जाणार 'नोटा'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी आचारसंहितेची घोषणा केली आहे. 7 एप्रिलपासून 12 मेपर्यंत नऊ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासोबत 16 व्या लोकसभेसाठी 16 मे रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे. याची माहिती देताना संपत यांनी सांगितले, की या लोकसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच 'नोटा'चा प्रयोग होणार आहे. 2013 मध्ये पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्या राज्यांतील मतदार दुसऱ्यांदाच 'नोटा'चा वापर करू शकतील.
काय आहे 'नोटा'
यावेळी ईव्हीएममध्ये 'नन ऑफ द अबाऊ' म्हणजेच 'नोटा'चा पर्याय दिला जाणार आहे. जर मतदारांना कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसेल तर 'नोटा'चा पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध राहणार आहे.
ओळख होणार नाही जाहीर
2013 मध्ये पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत एखाद्या मतदाराला 'नोटा'चा उपयोग करायचा असेल तर एक फॉर्म भरून द्यावा लागत असे. परंतु, आता लोकसभा निवडणुकीत असा फॉर्म भरून देण्याची गरज भासणार नाही.
पहिल्यांदा कधी आला 'नोटा'
2013 मध्ये 11 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या दरम्यान दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोरम या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. यावेळी पहिल्यांदा 'नोटा'चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता.
'नोटा'शी संबंधित काही बाबी
-27 सप्टेबर 2013 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 'नोटा'चा पर्याय उपलब्ध करून देण्यास सांगितले.
- 2009 मध्ये निवडणूक आयोगाने 'नोटा'चा पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात न्यायालयाला माहिती दिली होती.
- राजकारणातून भ्रष्टाचार कमी करण्यासाठी या पर्यायावर निर्णय घेण्यात आला होता.
- यामुळे राजकीय पक्ष चांगल्या प्रतिमेच्या उमेदवारांना तिकीट देतील, असे अपेक्षित होते.
जगभरात कुठे आहे 'नोटा'
कोलंबिया, युक्रेन, ब्राझिल, बांगलादेश, फिनलॅंड, स्पेन, स्विडन, चिली, फ्रान्स, बेल्जियम, युनान यासारख्या देशांमध्ये निवडणुकीत 'नोटा'चा पर्याय उपलब्ध आहे. रशियात 2006 च्या निवडणुकीत 'नोटा'चा पर्याय पहिल्यांदा उपलब्ध करून देण्यात आला होता.