आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Survey Credibality On Fire, Focus Only On Four States

निवडणूक सर्वेक्षणाची विश्वासार्हताच पणाला, फोकस पाच ऐवजी चारच राज्यांवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली - आगामी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम, दिल्ली विधानसभा निवडणुका असताना केवळ 4 राज्यांतील राजकीय चित्र नेमके काय असेल, याबाबत अंदाज बांधले जात आहेत. निवडणूकपूर्व सर्वेक्षण या अंदाजाला बळ देत आहेत. निवडणूक पाच राज्यांत असताना सर्वेक्षणात मात्र चार राज्यांनाच महत्त्व दिले आहे. एका सर्वेक्षणात काँग्रेस सपाटून मार खाणार, तर भाजपचा उदय होईल, असे भाकीत वर्तवण्यात आले. तीन सर्वेक्षणांच्या तीन त-हा असल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवर संशय आहे.


तीन सर्वेक्षणांचे तीन निकाल
टाइम्स नाऊच्या अंदाजानुसार, दिल्लीमध्ये काँग्रेसला 29, भाजपला 30, तर आम आदमी पार्टी ‘आप’ला 9 जागा मिळतील. हेडलाइन्स टुडेने ही संख्या अनुक्रमे 28, 28 आणि सात सांगितली आहे. याव्यतिरिक्त एचटी-सीफोरनुसार, काँग्रेसला 32 ते 37, भाजपला 22 ते 27 आणि ‘आप’ला 12 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.