आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिक-हायब्रीड वाहन खरेदीवर सूट, औरंगाबाद-नाशिककरांना मिळणार सवलत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांचा वापर वाढवण्यासाठी सरकारने शहरांची नावे निश्चित केली आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई, वसई आणि विरार या शहरांचा समावेश आहे. ही शहरे एप्रिलमध्ये लाँच झालेल्या ‘फेम इंडिया’ या योजनेच्या पहिल्या टप्प्याचा भाग आहेत. सरकार दुचाकी आणि कारच्या खरेदीवर ग्राहकांना १,८०० पासून १.३८ लाखांपर्यंत सबसिडी देईल. या निर्णयामुळे २०२० पर्यंत ६२,००० कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होईल, असा अंदाज आहे.

सरकार या शहरांत अशा वाहनांची खरेदी आणि चार्जिंग स्टेशनसह आवश्यक पायाभूत सोयीही तयार करेल. अवजड उद्योग मंत्रालयाने या योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या शहरांची यादी भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, सियाम ही ऑटो उद्योगाची शीर्ष संस्था आणि इतर विभागांना पाठवली आहे.

फेम इंडिया योजना : अवजड उद्योग मंत्रालयाने एप्रिल २०१५ मध्ये फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स (फेम) योजना लाँच केली होती. त्यानुसार पहिल्या वर्षांत ७९५ कोटी रुपये खर्च केले जातील.
त्यात ग्राहकांना कमी किमतीवर हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहने देण्याची तरतूद आहे. सरकार इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांवर दिली जाणारी सवलत उत्पादकांच्या खात्यात भरेल.

अशी मिळेल सूट
दुचाकी १,८०० ते २९ हजार.
कार १३००० ते १.३८ लाख
तिचाकी ३,३०० ते ६१,०००.
बस ३४ ते ६१ लाख
बातम्या आणखी आहेत...