आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवालांच्या घराचे दोन महिन्यांचे वीज बील 91 हजार रुपये, RTI मध्ये उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाचे एप्रिल-मे महिन्याचे वीज बिल 91 हजार रुपये आले आहे. एका माहिती अधिकार (आरटीआय) अर्जाच्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे. वकील आणि महिती अधिकार कार्यकर्ते विवेक गर्ग यांनी आरटीआय अंतर्गत दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या वीज बीलाची माहिती मागवली होती. त्यांच्या अर्जाला दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या उत्तरात केजरीवाल यांच्या सिव्हिल लाइनमधील निवासस्थानाच्या 91 हजार रुपये वीज बीलाची प्रत दिली आहे.
भाजपचा दावा एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे बील
केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या वीज बीलावरुन दिल्लीत राजकारण सुरु झाले आहे. विरोधीपक्ष भाजपने यावरुन आप सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचा दावा आहे, की केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाचे वीज बिल 91 हजार नसून एक लाख रुपये आहे. दिल्ली भाजप प्रवक्ते प्रवीण कपूर म्हणाले, 'दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानाचे वीज बिल 91 हजार रुपये नसून एक लाख रुपये आहे. आमची मागणी आहे, की दिल्ली सरकारच्या सर्व मंत्र्यांची निवासस्थाने आणि कार्यालयाचे वीज बिल सार्वजनिक केले पाहिजे.' कपूर यांनी दावा केला, की केजरीवाल यांच्या निवासस्थानी दोन मीटर आहेत. एका मीटरचे बिल 55 हजार आणि दुसऱ्याचे 48 हजार रुपये आहे. एकूण 103000 रुपये बिल आले आहे.
सरकार चौकशी करणार
मुख्यमंत्री निवासस्थानाचे वीज बिल लाखभर रुपये आल्यानंतर आप सरकारने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनूसार, सरकारी निवासस्थानात खरच एवढा वीजेचा वापर झाला आहे, का किंवा चूकीने हे बील देण्यात आले, याचा सरकार शोध घेणार आहे.