आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Elephant Demolition At Rajghat, Police Beat Photographer

राजघाटवर उत्‍पात हत्‍तीचा, अन् शिक्षा छायाचित्रकाराला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- राजघाटाच्‍या मुख्‍य प्रवेशद्वाराला एका उन्‍मत्‍त हत्‍तीने धडक दिल्‍याने प्रवेशद्वाराचे थोडे नुकसान झाले आहे. उन्‍मत्‍त हत्‍तीचा उच्‍छाद कॅमे-यात कैद करण्‍याचा प्रयत्‍न मानस रंजन या छायाचित्रकाराने केला असता त्‍याला याची मोठी किंमत मोजावी लागली. हत्‍तीला आवर घालणा-या पोलिस कॉन्‍स्टेबलला छायाचित्रकाराचे छायाचित्रे घेणे पसंत न पडल्‍याने त्‍याला बेदम मारहाण झाली आहे.

झाले असे की, राजघाटाच्‍या मुख्‍य प्रवेशद्वाराजवळ एक उन्‍मत्‍त हत्‍तीला आवर घालणा-या पोलिसांची चांगलीच त्रेधात्रिपट उडाली होती. हा सर्व प्रकार छायाचित्रकार मानस रंजन टिपत होता. त्‍याचे हे वर्तन न आवडल्‍याने कॉन्‍स्टेबल संदीप ते‍वतियाने हत्‍तीवरचा राग छायाचित्रकारावर काढला. त्‍याला बेदम मारहाण केली. तथापी हत्‍ती उन्‍मत्‍त का झाला याचे कारण कळू शकले नाही.

'मी माझे कर्तव्‍य निभावत होतो, कॉन्‍स्टेबल संदीप ते‍वतियाने मला नाहक मारले' आपण त्‍यांची पोलिस आयुक्‍तांकडे तक्रार करणार असल्‍याचे छायाचित्रकार रंजन यांनी सांगितले. विशेष म्‍हणजे हा सर्व प्रकार पाहून बाकीचे कॉन्‍स्टेबल हसत होते. त्‍यापैकीच एका कॉन्‍स्‍टेबलने तेवतियांना थांबवण्‍याचा प्रयत्‍न केला.

पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रकाराला मारहाण करतानाची छायाचित्रे...