आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणीबाणी हा काळा अध्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात आणीबाणी लागू झाली होती त्या घटनेला गुरुवारी ४० वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. अगोदर त्यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून आणीबाणी लागू करण्याच्या तेव्हाच्या राजकीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर टीका केली. नंतर विविध नागरी विकास योजनांच्या उद््घाटन समारंभातही त्यांनी काँग्रेसवर प्रहार केले. मोदी म्हणाले, २५-२६ जून १९७५ कुणीही विसरू शकत नाहीत. कारण या रात्री लागू झालेल्या आणीबाणीचा काळ म्हणजे देशाचा सर्वांत काळा अध्याय होता.

सत्तेच्या लालसेपोटी तत्कालीन राजकीय नेतृत्वाने (तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी) लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली. या काळात संपूर्ण देशच जणू तुरुंग झाला होता, याची आठवण मोदींनी सांगितली. आणीबाणीत जयप्रकाश नारायण चालवलेल्या आंदोलनाची आठवण सांगून तत्कालीन प्रशासनाने लाखो देशभक्त व लोकशाहीला मानणार्‍या लोकांना कसे तुरुंगात डांबून टाकले, याची आठवण करून दिली.

ज्या लोकांनी त्या काळात लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलने केली त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान असल्याचे सांगून माध्यमांवर आलेल्या निर्बंधांचीही त्यांनी आठवण करून दिली. एक युवक म्हणून आणीबाणीच्या काळात खूप काही शिकायला मिळाल्याचे सांगून लोकशाही मूल्यांची जपवणूक करण्यासाठी कसून प्रयत्न करण्याची गरज मोदींनी प्रतिपादीत केली.
बातम्या आणखी आहेत...