आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Employee Dearness Allowance Increases By 10 Percent, Centre Announce Next Month

कर्मचा-यांचा महागाई भत्ता 10 टक्क्यांनी वाढणार, केंद्र करणार पुढील महिन्यात घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात 10 टक्के वाढ करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून पुढील महिन्यात याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. याचा लाभ 50 लाख कर्मचारी तसेच 30 लाख निवृत्त कर्मचा-यांना होणार आहे. वर्षभरातील ही दुसरी वाढ असेल.
गेल्या सप्टेंबरमध्ये केंद्राने महागाई भत्ता 10 टक्के वाढवून 90 टक्के केला होता. नव्या घोषणेनंतर तो 100 टक्के होईल. सूत्रांनुसार महागाई भत्त्यातील ही वाढ 1 जानेवारीपासून लागू असेल. दरम्यान, केंद्रीय कर्मचारी संघटनांनी महागाई भत्त्यातील वाढीबद्दल नाराजी व्यक्त केली. मुळातच महागाई प्रचंड वाढल्याने दैनंदिन खर्चात 300 टक्के वाढ झाली आहे. मात्र, सरकार केवळ 100 टक्के महागाई भत्ता देत असल्याचे केंद्रीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के. के. एन. कुट्टी म्हणाले.
निवृत्तीचे वय 60 होणार!
ईपीएफओअंतर्गत येणा-या कर्मचा-यांसाठी निवृत्तीचे वय 58 वरून वाढवून 60 केले जाऊ शकते. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक बुधवारी होणार असून त्यात यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या पेन्शनसाठी ईपीएफओअंतर्गत 58 वर्षांनंतर योगदान देता येत नाही.