आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाचे वेड, कर्मचाऱ्यांचा ३२% वेळ वाया, अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोशल मीडियाचे व्यसन आता सर्वत्र भिनले आहे. विविध सोशल मीडिया पाहण्यात देशातील कर्मचाऱ्यांचा ३२ टक्के कामाचा वेळ वाया जात असल्याचा धक्कादायक निष्कर्ष टीमलीजने केलेल्या अभ्यासातून काढला आहे. टीमलीजच्या वर्ल्ड ऑफ वर्क अहवालानुसार कामकाजाच्या वेळी प्रत्येक कर्मचारी दिवसाकाठी दोन तास ३२ मिनिटे एवढा वेळ सोशल मीडियावर खर्च करतो. सोशल मीडियाच्या यथेच्छ वापरामुळे एकूण उत्पादकतेत १३ टक्के घट येत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

टीमलीज सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष कुणाल सेन यांच्या मते, आता कंपन्यांसमोर हे नवे आव्हान आहे. सोशल मीडियाने कर्मचाऱ्यांवर गारूड केलेले आहे. त्याचा वापर केल्याने निष्काळजीपणा वाढून केवळ टाइमपास होत आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या कामकाजावेळी वापराविषयी धोरण निश्चित करताना ते आंधळेपणाने न आखता, याचा मुळापासून विचार करावा. कार्यालयातील कामकाजाची पद्धत अधिकाधिक महात्त्वाकांक्षी बनवावी लागेल. काही ठिकाणी असे धोरण आहे, काही कंपन्या ते ठरवत आहेत, तर काही कंपन्यांना हा धोका कसा हाताळावा याची माहिती नाही.

अनेक दुष्परिणाम
कामाच्या वेळी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे अनेक दुष्परिणाम होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
{गोपनीय माहिती फुटणे
{संस्था, कर्मचाऱ्यांची बदनामी
{चुकीची माहिती मिळणे
{कर्मचारी अपयशी ठरणे
{निष्काळजीपणात वाढ

सर्वाधिक वापर फेसबुकचा
या अहवालानुसार, कामाच्या वेळी फेसबुकचा वापर सर्वाधिक वापर होतो. कामाच्या वेळी सोशल मीडियावर असणाऱ्या एकूण ६२ टक्के कर्मचाऱ्यांपैकी ८३ टक्के फेसबुकचा वापर करतात, असे दिसून आले.
बातम्या आणखी आहेत...