आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Encounter With Security Forces Underway In Jammu Kashmir Militants Killed

J&K मध्ये दहशतवाद्याला कंठस्नान, PAKच्या गोळीबारात जवान शहीद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/श्रीनगर- जम्‍मू-काश्‍मीरमधील नौसेरा व राजोरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सने सोमवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यात एलओसीवर तैनात बीएसएफचा एक जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे, कुपवाडामध्ये मागील 10 दिवसांपासून लष्कराने सुरु केलेल्या ऑपरेशन एन्काउंटरमध्ये लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे.

लष्कराने सुरु केलेल्या ऑपरेशन एन्काउंटरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले. दोन दहशतवादी जंगलात लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्कराने ऑपरेशन एन्काउंटर सुरु केले आहे.

दरम्यान, शनिवारपासून (21 नोव्हेंबर) हंदवाडा येथे लष्कराचे ऑपरेशन एन्काउंटर सुरु आहे. यात एक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ऑपरेशन अजून सुरुच आहे. आतापर्यंत लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहेत.

हंदवाडा व कुपवाडामध्ये दहशतवादी लपले असल्याची गोपनिय माहिती काही दिवसांपूर्वी लष्कराला मिळाली होती. यानंतर लष्कर व पोलिसांनी संयुक्त सर्च ऑपरेशन सुरु केले होते. पथक दहशतवाद्यांच्या ठिकाण्यापर्यंत पोहोचले असता दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यात कर्नल संतोष महाडीक शहीद झाले. दहशतवाद्यांच्या गोळीबारांला प्रत्युत्तर देत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.