आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरबी शब्दांचा अर्थ सांगता न आल्यास घालतात गोळ्या, अपहृत भारतीयांवर अनेक अत्याचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ चंदिगड - इराकमध्ये आयएसआयएसचे अतिरेकी भारतीयांसह सर्वच प्रवासी मजुरांना अरबी भाषेतील काही शब्दांचे अर्थ विचारतात. उत्तर चुकीचे आले की ते सरळ गोळ्या घालतात. याशिवाय अतिरेक्यांना स्नान घालणे, त्यांचे बूट स्वच्छ करणे, कपडे धुणे अशी कामेही अतिरेकी करून घेतात.
दुजेलमध्ये काही पंजाबी लोक राहतात. एका वृत्तपत्राने त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला तेव्हा हा भयंकर प्रकार उघडकीस आला. पंजाबमधील एका तरुणास अतिरेक्यांनी दुजेलजवळ बसमधून उतरवले. त्याला एका अरबी शब्दाचा अर्थ विचारला. त्याने चुकीचे उत्तर देताच अतिरेक्यांनी गोळी घातली. सुदैवाने तो बचावला आहे. या प्रकाराने इतर धास्तावले आहेत. मोसूलवर ताबा मिळवल्यानंतर बगदादच्या दिशेने निघलेले अतिरेकी दुजेलजवळ पोहोचले असले तरी सरकारी फौजांनी त्यांना रोखून धरले आहे. दुसर्‍या एका तरुणाने दिलेल्या माहितीनुसार अतिरेकी धर्म विचारतात. नंतर बसमध्ये बसवून घेऊन जातात. इराकमध्ये काम करायचे असेल तर इराकी संस्कृती आणि भाषेचा आदर करावाच लागेल, असे आदेशही अतिरेकी देत आहेत. आजवर मद्यसेवन केले नसल्याची खातरजमाही अतिरेकी करून घेतात.