आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालूंची मुलगी-जावयाची 7 तास चौकशी, मिसा भारती यांच्या 3 मालमत्तांवर ईडीचे छापे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या घरावर सीबीआय धाडींच्या २४ तासांतच त्यांची मुलगी मिसा भारती यांच्या दिल्लीतील तीन मालमत्तांवर शनिवारी अंमलबजावणी संचलनालयानेही (ईडी) धाडी टाकल्या. राज्यसभा खासदार मिसा आणि त्यांचे पती शैलेशकुमार यांच्यावर काळा पैसा पांढरा करण्याचा आरोप आहे. बिजवासन, सैनिक फार्म आणि घिटोरनी भागात या धाडी टाकण्यात आल्या आहेत.
 
ईडीच्या अधिकाऱ्यांनी मिसा आणि शैलेश यांची सुमारे सात तास चौकशी केली. दोघांचे मोबाइलही जप्त केले आहेत. सायंकाळी ४ वाजता ईडीचे अधिकारी शैलेश यांना घिटोरनी फार्म हाऊसवरून सैनिक फार्म हाऊसवरून घेऊन गेले. तेथे बंद अवस्थेत असलेल्या काही खोल्यांना शैलेश यांच्यासमोर उघडून तपास करण्यात आला. मिसा आणि शैलेश यांच्यावर काळा पैसा पांढरा करण्याचा आरोप आहे. त्यांची मिशेल या कंपनीत चार बनावट कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यात आली होती. याच पैशांतून दिल्लीत फार्म हाऊस खरेदी करण्यात आले होते. ईडीने या प्रकरणात आधीच बनावट कंपन्यांचे मालक जैन बंधू आणि शैलेश यांचे सीए राजेश अग्रवाल यांना अटक केलेली आहे. बेनामी मालमत्ता प्रकरणात प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी मिसा यांची २१ जूनला पाच तास चौकशी केली होती. याआधी विभागाने लालूंच्या कुटुंबीयांच्या १२ पेक्षा जास्त मालमत्ता जप्त केल्या होत्या.

९० बनावट कंपन्या
कुमार व वीरेंद्र जैन यांच्याशी संबंधित ८ हजार कोटींच्या मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात या धाडी होत्या. ९० बनावट कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा काळा पैसा पांढरा करण्यात आला. यातील एक कंपनी मिशेल प्रिंटर्स प्रा. लि. मध्ये मिसा व त्यांचे पती शैलेश संचालक होते. २००७-८ मध्ये या कंपनीचे १.२० लाख शेअर्स १०० रुपयांच्या दराने चार बनावट कंपन्यांनी खरेदी केले होते.
 
बातम्या आणखी आहेत...